शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गरजू लाभार्थ्यांना घरकूल मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:48 IST

प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल योजनेतंर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांची पंचायत समिती कार्यालयात पायपीट सुरुच आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची पंचायत समितीत पायपीट : प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल योजनेतंर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांची पंचायत समिती कार्यालयात पायपीट सुरुच आहे. पण यानंतरही त्यांची पंचायत समिती प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने समस्या कायम आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील कोसबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मेंडकी येथील एका गरीब गरजू लाभार्थ्याला घरकुल न मिळाल्याने त्यांना पावसातच दिवस काढावे लागणार आहे. शासनाचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रत्येक गावात गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याची योजना सुरू केली आहे. पण गरजू लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जात नसल्याने त्यांची अडचण होत आहे. तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोसबी अंतर्गत येत असलेल्या मेंडकी येथील रेवचंद इस्तारी फुंडे यांचे घरकुल योजनेच्या यादीमध्ये ५६ व्या क्रमांकावर नाव आहे. मात्र अनुक्रमांकानुसार गावात २२ व्या क्रमांकाच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे फुंडे यांचा नंबर लागण्यास पुन्हा वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी यंदाचा पावसाळा फुंडे यांच्या कुटुंबीयांना पावसात काढावा लागणार आहे.पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांचा क्रम तयार केला नसल्याने गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाpanchayat samitiपंचायत समिती