शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:25 IST

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे.

बडोले : धम्मकुटी येथे ४ कोटी रोपटी लावणार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विषारी किरणे पृथ्वीवर येत आहेत. उत्तर धृवावरचा बर्फ वितळताना दिसतो आहे. यासर्व घडामोडी पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे घडून येत आहे. बिघडलेल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड आज काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शनिवारी (दि.१) सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा-पळसगाव जवळील सम्यक संकल्प धम्मकुटी येथे ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रदिपकुमार बडगे, भंते संघधातू, तहसीलदार विठ्ठल परळीकर, जैवविविधता समिती अध्यक्ष विलास चव्हाण, माजी जि.प.सदस्य किरण गावराणे, पं.स.सदस्य जोशीला जोशी, बाजार समतिीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, पुष्पमाला बडोले, विठ्ठल साखरे, चेतन वडगाये उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी काळे यांनी, जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी १५ लाख खड्डे करण्यात आले आहे. टिश्यू कल्चरच्या माध्यमातून २ लाख पिवळ््या पळसाची रोपटी तयार करण्यात येतील. परदेशी वृक्षांची लागवड न करता केवळ देशी वृक्षांची लागवड राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून माहिती देतांना युवराज यांनी, जिल्ह्याला १२ लाख ३० हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात १५ लाख ९७ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ४०० रोपांची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अन्य मान्यवरांनी सम्यक संकल्प धम्मकुटीच्या परिसरात वृक्ष लागवड केली.