शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:08 IST

कचारगड यात्रेनिमित्त धनेगाव येथील प्रांगणात राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन घेण्यात आले. या महाधिवेशनात देशातील गोंडी समाजाच्या विविध मान्यवरांनी आपापले विचार मांडून गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : धनेगावात राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडी धर्मभूमी कचारगड : कचारगड यात्रेनिमित्त धनेगाव येथील प्रांगणात राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन घेण्यात आले. या महाधिवेशनात देशातील गोंडी समाजाच्या विविध मान्यवरांनी आपापले विचार मांडून गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.उद्घाटन जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे होत्या. अतिथी म्हणून जि.प. सदस्य विजय टेकाम, पं.स. सभापती अर्चना राऊत, उपसभापती दिलीप वाघमारे, वासुदेव चुटे, संजय दोनोडे, रीता दोनोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी कोया पुनेम महोत्सवाच्या महापूजेत आपला सहभाग नोंदविला. जि.प. अध्यक्ष मडावी यांनी कचारगड यात्रेदरम्यान उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.याप्रसंगी जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी यात्रेदरम्यान भाविकांना उपलब्ध सोयी-सुविधांची माहिती दिली. यात्रेत येणाºया सर्व भाविकांना विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने भोजन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा आदी पुरविण्यात आल्या आहेत. गुहा परिसरात आबालवृद्ध भाविकांना गुहेपर्यंत जाण्यासाठी पोलीस प्रशासनाने जवान तैनात केले आहेत. कचारगड यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी आ. संजय पुराम घेत आहेत. त्यामुळे स्थानिक समितीसह प्रशासनसुद्धा सोयीसुविधांवर नजर ठेवून आहे.