शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी प्रयत्नांची गरज

By admin | Updated: August 28, 2014 23:53 IST

वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज लक्षात गेऊन येथे कृषी संशोधनाला चालना देण्यात आली. त्यासाठीच या कृषी संशोधन केंद्राची येथे उभारणी केली होती.

इमारतीला अवकळा : कर्मचारीही झाले हतबलयशवंत मानकर - आमगाववाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज लक्षात गेऊन येथे कृषी संशोधनाला चालना देण्यात आली. त्यासाठीच या कृषी संशोधन केंद्राची येथे उभारणी केली होती. परंतु शासनाचा निधी मिळविण्यासाठी या विभागाने प्रामाणिक प्रयत्नच केले नसल्याने कृषी संशोधन मागे पडले आहे.केंद्र व राज्य शासनाने १८८१ मध्ये फेमीन कमिशनच्या सिफारशीने कृषी खात्याची स्थापना १८८३ केली. ग्रामीण भागात शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरूवात झाली. १९४३ मध्ये तत्कालीन सरकारने कृषी धोरण अवलंबून पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यास सुरूवात झाली. स्वातंत्र्योत्तर हरित क्रांतीने शेतीच्या विकासाला चालना मिळाली. १९५७ पासून तालुका बिज गुणन केंद्रामार्फत दर्जेदार बियाणे उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात आले. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताच्या वापराने नवीन संशोधनाला प्रगती दिली.शेती विकासाला पुरक अशी सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी नाला बांध बदिस्तीही हाती घेण्यात आले. शेतकऱ्यांना सिंचन विहीरीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषी विद्यापीठातील सुधारित तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, प्रचार सभा, चर्चासत्रे, मेळावे व प्रदर्शनी या कार्यक्रमाच्या माध्यमाने शेती विकासावर भर देण्यात आला. यामुळे शेतकरी शेती व्यवसायातून स्वयंपूर्णतेबरोबर आर्थिक संपन्नता वाढविणारा दुवा ठरला. शासनाने आधुनिक कृषीतंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानला. शेतकऱ्यांच्या शेतशिवारात आधुनिक शेतीसह फळबाग, लागवडकरिता योजना हाती घेतली. कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन निधी व योजनांची पूर्तता केली आहे. या निधीचा व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागातील संशोधन कार्याला गती दिली. परंतु कालांतराने योजना असूनसुध्दा शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञानात मागे पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानातील शेतीव्दारे पीक उत्पादन वाढ व्हावी यासाठी तंत्रज्ञान महत्वपूर्ण आहे. परंतु सदर विभागातील तंत्रज्ञान राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमात वाहून देण्यात येत असल्याचे दिसते.शासनाने शेतकऱ्यांसाठी समूह शेतीची नवकल्पना समोर करून शेती विकासाचे ध्येय ठेवले. यासाठी शासनाने संशोधनाची सोय उपलब्ध केली आहे. आधुनिक संशोधनातून शेतकऱ्यांना लाभ मिळून शेती उत्पादनात भरीव वाढ करावी यासाठी पुरस्काराची साथ त्यांना देण्यात आले. परंतू प्रत्यक्षात तालुक्यातील शेतकरी मात्र आधुनिक तंत्रज्ञान व योजनांपासून वंचितच असल्याने शेती व्यवसायातून मागे पडत आहे. योजना व अनुदान नसल्याने संशोधनाची कल्पना मात्र हवेतच मुरताना दिसत आहे.