शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंग लावणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 22:19 IST

दरवर्षी शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठीे व भविष्यातील शाश्वत नियोजनासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन शासकीय इमारतींसह २०० चौरस मीटर पेक्षा जास्त आर.सी.सी.संरचना असलेले बांधकाम अथवा विद्यमान बांधकामाला रेन वॉटर हार्वेस्टिंग लावण्याचे नगर परिषदेने बंधनकारक केले आले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईवर उपाय योजना : भविष्यात होणार शहरवासीयांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठीे व भविष्यातील शाश्वत नियोजनासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन शासकीय इमारतींसह २०० चौरस मीटर पेक्षा जास्त आर.सी.सी.संरचना असलेले बांधकाम अथवा विद्यमान बांधकामाला रेन वॉटर हार्वेस्टिंग लावण्याचे नगर परिषदेने बंधनकारक केले आले आहे.जमिनीतील पाण्याचा स्तर वाढवून भविष्यातील निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी व जमिनीतील पाणी साठा वाढेल यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोणत्याच शासकीय इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लावण्यात आलेले नाही. जर सर्व शासकीय इमारतींमध्ये हे सिस्टीम लावण्यात आले तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात व्यर्थ जाणारे पाणी जमा होऊन जमिनीपर्यंत पोहचिवल्या जाईल.जिल्ह्यात जवळपास ११०० ते १३०० मिमी पाऊस होतो. जर सर्व शासकीय इमारती व दोन मजली इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लावण्यात आले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी गोळा करुन जमिनीतील स्त्रोतांपर्यंत पोहचविल्या जाऊ शकते.त्यामुळे भविष्यातील पाणी संकट टाळता येईल. हा उद्देश ठेवून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी पुढाकार घेत नगर परिषदेच्या माध्यमातून कार्यालयाच्या तीन इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग लावण्याचे निर्णय घेतला आहे.गोंदिया शहरातील नगर परिषदेच्या सर्व शाळा, व्यापारी संकूल अशा ठिकाणी देखील हे सिस्टीम लावण्याचे निर्देश मागील आठवड्यात संबंधितांना दिले होते.दरम्यान, शहरातील २०० चौ.मी.पेक्षा जास्त असलेल्या आर.सी.सी. संरचना असलेल्या बांधकाम अथवा विद्यमान घराला रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे काही अंशी जमिनीत पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे.होणार दंडात्मक कारवाईशहरातील २०० चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम अथवा विद्यमान घराला रेनवाटर हार्वेस्टिंग लावण्याचे नगर परिषदेकडून बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी याची नोंद घेऊन सदर प्रकल्प लावण्याचे निर्देश दिले आहे. याचे पालन करणाऱ्या संबंधित मालमत्ता धारकाकडून मालमत्ता करासह दंडात्मक शुल्क घेण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस