शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

न.प. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:38 IST

राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या निर्णयाचा लाभ राज्यभरातील १६ हजार शिक्षकांना होणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील १६ हजार शिक्षकांना होणार लाभ : संघटनेचा यशस्वी पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या निर्णयाचा लाभ राज्यभरातील १६ हजार शिक्षकांना होणार आहे.राज्यात बहुतेक ठिकाणी महानगरपालिका आणि नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत प्राथमिक शाळा असून यात जवळपास १६ हजार शिक्षक कार्यरत आहे.शासनाने सातवा वेग लागू करण्याचा निर्णय घेतांना मात्र यातून नगर परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षकांना वगळले होते. त्यामुळे नगर परिषद आणि नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता.नगर परिषदे अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांबाबतचा दुजाभाव दूर करण्यात यावा, यासाठी शिक्षक सहकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रविंद्रकुमार अंबुले,रविंद्र तिजारे,सुरेंद्र गौतम, संदीप खर्डे,चंद्रकांत सहारे,प्रशांत पांडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी भेट घेऊन त्यांना हा दुजाभाव दूर करुन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. तसेच यासाठी सातत्याने पाठपुरवा सुरू ठेवला होता. त्याची दखल शासनाने २ आॅगस्ट २०१९ रोजी नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.यासंबंधीचा जीआर सुध्दा शासनाचे सचिव सं.श.गोखले यांनी काढला आहे.त्यामुळे या निर्णयाचा लाभ राज्यातील १६ हजार शिक्षकांना होणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.