शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राष्ट्रवादीच्या मोर्चाची जोरदार धडक

By admin | Updated: December 11, 2015 02:18 IST

आमगाव तालुका व संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसोबत शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी

दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी-बेरोजगारांचेही प्रश्न सोडवाआमगाव : आमगाव तालुका व संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसोबत शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमगावात धडक मोर्चा काढण्यात आला. माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, कृउबा समितीचे सभापती रमेश ताराम, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी, बेरोजगार सहभागी झाले होते.स्थानिक राधिका लॉन बनगाव येथून प्रारंभ झालेला हा मोर्चा कामठा चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक येथून पुन्हा गांधी चौकात येऊन तिथे सभेत रुपांतरित झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले. त्यात आमगाव तालुका व जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, धानाला ३ हजार रुपये भाव द्या, कृषी बिल माफ करा, आणेवारी पद्धत बदलवा, शेतकऱ्यांना रबीसाठी मोफत बियाणे द्या, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करा, ओबीसी विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती द्या यासह वीट भट्टी, ट्रॅक्टर असोसिएशन व आमगाव तालुक्याच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चाला मार्गदर्शन करताना माजी आ.दिलीप बन्सोड यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून नवीन वीज कनेक्शन तातडीने देण्याची मागणी केली. माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी बोगस बियाणे आणि बोगस कीटकनाशकामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली. सभापती रमेश ताराम, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, महेश जैन, सुरेश हर्षे यांनीही मार्गदर्शन केले. या मोर्चात प्रामुख्यने कमल बहेकार, माजी सभापती टिकाराम मेंढे, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, पं.स.सदस्य प्रमोद शिवनकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक तथा ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)