गोंदिया : गोरेगाव ग्राम पंचायतीसह या तालुक्यात विकासासाठी आतापर्र्यंत सी.एस.आर. योजनेंतर्गत व खासदार, आमदार फंडातून विविध कोट्यावधीचा निधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामे मार्गी लावली. यापुढे गोरेगाव हे विकसित शहर बनवण्यासाठी नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबा मत द्या, असे आवाहन आ.राजेंद्र जैन यांनी गोरेगाव येथे पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे होते. यावेळी माजी आ.दिलीप बंसोड, जिल्हा महिलाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, ओबीसी जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष लक्ष्मणराव चंद्रीकापुरे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, राकाँ तालुकाध्यक्ष केवल बघेले, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, बँक संचालक गोपीचंद थावानी उपस्थित होते. माजी आ.बंसोड यांनी केंद्राचे व राज्याचे शासन सामान्य जनतेसाठी, शेतकरी व बेरोजगारासाठी अन्यायी व जुलमी असल्याचे मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणातून ओबीसी जिल्हाध्यक्ष कटरे यांनीही शासनाविरूध्द आगपाखड केली. संचालन केवल बघेले यांनी तर आभार दलित आघाडीचे तालुका अध्यक्ष आदेश फुले यांनी मानले. (प्रतिनिधी)इसमाचा मृत्यू गोंदिया : कहाली येथील बंसीलाल मारबदे (४०) या इसमाचा उपचार घेताना मंगळवारच्या दुपारी ४ वाजता ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे मृत्यू झाला. पाठीच्या आजारामुळे तो दाखल झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
राष्ट्रवादीचा गोरेगावात श्रीगणेशा
By admin | Updated: October 22, 2015 02:44 IST