रास्ता रोको आंदोलन : ४९ मागण्यांचे निवेदन गोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गोरेगाव येथील दुर्गा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केवल बघेले यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार एन.एम. वेदी, पं.वि. अधिकारी ए.के. गिऱ्हेपुंजे यांना सामान्य जनतेच्या ४९ मागण्यांचे निवेदन राज्य व केंद्र शासनाला पाठविण्यासाठी देण्यात आले. या वेळी राकाँ तालुकाध्यक्ष केवल बघेले यांनी मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. रास्ता रोको आंदोलनात राकाँ जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, महिला आघाडी अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, जि.प. सदस्य ललीता चौरागडे, जि.प. सदस्य पंचम बिसेन, राकाँ तालुका उपाध्यक्ष डुमेश चौरागडे, नगरसेवक डॉ. रुस्मत येळे, डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले, देवचंद सोनवाने, बाबा बहेकार, तालुका सचिव सोमेश रहांगडाले, ओमप्रकाश ठाकुर, रिकेश रहांगडाले, नितेशा पटले, युवाध्यक्ष बाबा बोपचे, भोजराज ब्राम्हणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संचालन आदेश फुले यांनी केले. तहसील व पं.स. च्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार एन.एम. वेदी व पं.वि. अधिकारी ए.के. गिऱ्हेपुंजे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी शासनाच्या योजना फसव्या आहेत याबाबत कार्यकर्ते व सामान्य जनतेला मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. रुस्तम येळे, डॉ. सजय रहांगडाले, डुमेश चौरागडे, राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, केवल बघेले यांनी मार्गदर्शन केले. मागण्या मंजूर न झाल्यास प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर
By admin | Updated: April 21, 2017 01:39 IST