शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला न जुमानता बीईओने दिला नक्षलभत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:39 IST

शासन आणि जिल्हा परिषदेची मंजुरी नसताना तिरोडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २००६ पासून नक्षलभत्ता काढून दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. या पंचायत समित्यांतर्गत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये सुमारे साडेतीन हजार शिक्षक कार्यरत आहेत.

ठळक मुद्देअन्य तालुक्यांत ही द्यावा : शिक्षक समितीने केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन आणि जिल्हा परिषदेची मंजुरी नसताना तिरोडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २००६ पासून नक्षलभत्ता काढून दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे.जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. या पंचायत समित्यांतर्गत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये सुमारे साडेतीन हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्या शिक्षकांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार नक्षलभत्ता देण्यात यावा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. त्याकरिता त्यांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येईल. सहाव्या वेतन आयोगानुसार नक्षलभत्ता देण्यात येणार नाही असे निवेदन जिल्हा परिषदेने दिले होते. राज्य शासनानेदेखील तो प्रस्ताव नामंजूर केला.आता सातवा वेतन आयोग लागू झाला, परंतु शासनाने सहाव्या वेतन आयोगाचा नक्षलभत्ता काढण्यास मंजुरी दिली नसताना देखील आणि इतर सात पंचायत समित्यांतील सुमारे तीन हजार शिक्षकांना याचा लाभ मिळाला नसताना तिरोडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २००६ पासून नक्षलभत्ता काढून दिला. प्रतिशिक्षक अंदाजे १५०० रुपये प्रमाणे हा निधी देण्यात आला. याचा लाभ तिरोडा पंचायत समितीतील ३०० शिक्षकांना मिळाला असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्याकरिता १५ टक्के कमिशनदेखील घेतल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.शासन आणि जिल्हा परिषदेची मंजुरी नसतानादेखील तिरोडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कोणत्या आधारावर हा निधी काढला असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तिरोडा पंचायत समितीप्रमाणे इतर पंचायत समित्यांतील शिक्षकांनादेखील नक्षलभत्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षण विभाग एकाला मावशीचा आणि दुसऱ्याला मायेचा असा दुजाभाव करत असल्याचा आरोपदेखील केला.शिक्षकांना १५०० रुपये नक्षलभत्ता देण्यासंदर्भात कसलेही आदेश देण्यात आले नाही. शासनाने १४ मे रोजी तो निधी देण्यात यावा, असा आदेश दिला. यापूर्वी नक्षलभत्ता दिला नसल्याचे हमीपत्र गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून भरुन घेतले जात आहेत. १४ मे पुर्वी ज्यांनी वेतनात ती रक्कम काढली असेल त्यांच्याविरोधात वित्तीय अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.उल्हास नरडशिक्षणाधिकारी, जि.प.गोंदियाएकस्तर वेतनश्रेणी आणि इतर भत्ते यासंदर्भात जिल्ह्यातील शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाला तो निधी देण्यात येणार नसल्याचे सांगितले होते. शिक्षण विभागाची आस्थापना मोठी आहे. त्याचे सर्वेसर्वा शिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. शिक्षण विभागाने आपल्याकडे सादर केलेले बिल काढण्यात आले.अ.क.मडावीमुख्य लेखा व वित्त अधिकारी.

टॅग्स :Teacherशिक्षक