शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त दरेकसाची आरोग्य सेवा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता येथील नियमित वैद्यकीय अधिकारी रजेवर गेलेले असल्याचे सांगितले. दुसरे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संपर्क साधला असता ते प्रशिक्षणासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. तर फिरते आरोग्य पथकात काम करणारे डाॅक्टर येथे बाह्यरुग्ण तपासणी करण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा :  जिल्ह्यातील सर्वात जास्त अतिसंवेदशील व नक्षलग्रस्त भागात असलेल्या दरेकसा परिसराची आरोग्य सेवा कोलमडली असून, रुग्णसेवा वाऱ्यावर आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासन गाढ झोपेत आहे. या भागात एकीकडे मलेरियाचे थैमान असून, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील एका वर्षापासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाही आहे. त्यामुळे मलेरिया नमुना रक्त तपासणी वेळेवर होत नाही आणि त्वरित मलेरियाचे निदान होत नाही. मात्र यानंतरही आरोग्य विभागाने रिक्त पदे भरली नसल्याने आदिवासीबहुल भागातील आरोग्य सेवा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता येथील नियमित वैद्यकीय अधिकारी रजेवर गेलेले असल्याचे सांगितले. दुसरे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संपर्क साधला असता ते प्रशिक्षणासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. तर फिरते आरोग्य पथकात काम करणारे डाॅक्टर येथे बाह्यरुग्ण तपासणी करण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असून, या सर्वात महत्त्वाचा पद म्हणजे नमुना तपासणी करणारा प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोणीच नाही. अशात येथील डॉक्टर रुग्णांना थेट सालेकसा रेफर करण्याचे काम करीत आहे. या महिन्यात मलेरिया रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि आरोग्य विभागात धावपड सुरू झाली. अशात तालुका आरोग्य यंत्रणेने खासगी प्रयोगशाळा तंत्रज्ञान तात्पुरत्या स्वरूपात बोलावून स्लाइट तपासणीची कामे करवून घेतले. मलेरियाची परिस्थिती एवढी गंभीर झाली असली तरी आरोग्य विभागाने नियमित कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली नाही. 

दरेकसा येथे जाण्यास भाग पाडले -  मागील एक वर्षापूर्वीपर्यंत कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाने या प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत नऊ वर्षे आणि त्यापूर्वीसुध्दा तीन वर्षे असे एकूण १२ वर्षें सेवा दिली. मागील वर्षी त्याची बदली झाली. तरीसुध्दा बदली झाल्यावर त्यांनी मलेरियाची गंभीर परिस्थिती पाहून सहा महिने आणखी राहून सेवा दिली. परंतु त्यांच्या जागी दुसऱ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाठविण्याची गरज होती; पण एक वर्ष लोटूनसुध्दा जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही. आता हिवतापाचा कहर वाढला आहे. जिल्ह्यात बदली सत्रसुध्दा सुरू आहे. अशात प्रशासनाने नवीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ येथे पाठवून समस्या दूर करण्याची गरज आहे.

संवेदनशील भागात उधारीचे कर्मचारी का? -  दरेकसा परिसर अतिदुर्गम व डोंगराळ भागात असून, या भागात घनदाट वनाच्छादित क्षेत्र असल्याने या भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हिवतापाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असतो. अशात या भागात रुग्णसेवा देण्यासाठी नियमित व अतिरिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ असणे आवश्यक आहे; परंतु येेथे नियमित प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद एक वर्षापासून रिक्त असून, मागील फेब्रुवारी महिन्यापासून नमुना रक्त तपासणीचे काम बंद असल्यासारखे आहे. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीHealthआरोग्य