शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 21:45 IST

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देपारा ४३ डिग्रीवर : २५ पासून होणार सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ डिग्रीवर गेला असताना नवतपात काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.उन्हाळ््याच्या अवघ्या चार महिन्यांतील सर्वाधिक तापमान नऊ दिवसांत असते. असे म्हटले जाते व त्यालाच ‘नवतपा’ म्हणता. नवतापमध्ये रोहिणी नक्षत्र लागत असून सूर्य आग ओकत असल्याने हे नऊ दिवस चांगलेच तापतात. एक प्रकारे सुर्यदेव पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याचे वाटू लागते. यंदा येत्या २५ तारखेपासून ३ जूनपर्यंत नवतपा लागत आहे.त्यामुळे २५ तारखेपासूनचे नऊ दिवस कसे असणार याची कल्पना करताच अंगाची लाही लाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणात कसा तरी निघून गेला. मात्र आता मागील काही चार-पास दिवसांपासून उन्हाळयाचे चटके चाखायला मिळत आहे. रविवारी पारा ४४ डिग्रीवर पोहचल्याचे दिसले. यंदाचे हे कमाल तापमान असून उन्हाची ही सरशी बघता घरातून बाहेर निघणे कठिण झाले आहे. उन्ह वाढतच चालल्याने गरम हवेच्या लाटा वाहत असून अंगाची लाही-लाही होत आहे.एसी व कुलर झाले फेलउन्हाळ््यापासून मुक्ती मिळावी यासाठी एसी व कुलरचा सहारा घेतला जात आहे. मात्र उष्णता एवढी आहे की त्यापुढे एसी व कुलरसुद्धा काम करीत नाही. उष्ण हवेच्या लाटांमुळे एसी व कुलरची हवा उष्ण होत आहे. मात्र काही केल्या गरमीपासून मुक्तता मिळणे कठिण झाले आहे. तर घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांतूनही अंगाला भाजून टाकणार एवढे गरम पाणी येत आहे. त्यामुळे दिवसभराच्या उष्णता व घाम यामुळे चिपचिप झालेल्या अंगाला धूवून काढण्यासाठी सायंकाळची आंघोळही कठिण झाली आहे.जिल्ह्याची यंत्रणा माहिती देण्यात अपयशीजिल्ह्यातील दररोजच्या तापमानाची नोंद तसेच मागील वर्षांतील तापमानाबद्दल माहिती पुरविण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा अपयशी ठरत आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले नियंत्रण कक्ष फक्त नावापुरतेच आहे. तहसील कार्यालयाकडून पूर्वी असलेली व्यवस्थाही आता बंद पडून आहे. यावरून येथील यंत्रणा किती तत्परतेने कार्य करीत आहे हे दिसून येते.