शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बँकानी वाटले केवळ २० टक्के पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:26 IST

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असून या बँकानी आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी सुध्दा या बँकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची आघाडी : ग्रामीण बँक संथगतीने, आत्तापर्यंत ५६ टक्के उद्दिष्टपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असून या बँकानी आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी सुध्दा या बँकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.शासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना ३०३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला एप्रिल महिन्यांपासूनच सुरूवात झाली. मात्र चार महिन्याच्या कालावधीत या तिन्ही बँकांनी आत्तापर्यंत केवळ ५६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ८९ कोटी ८२ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे २६ हजार १२९ शेतकºयांना वाटप केले आहे. तर सर्व राष्ट्रीयकृत बँकानी १७१८ शेतकºयांना १७ कोटी ३५ लाख रुपये आणि ग्रामीण बँकेने २०१७ शेतकºयांना १८ कोटी ८७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. या सर्व बँकाच्या पीक कर्ज वाटपाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ९०.७१ टक्के, राष्ट्रीयकृत बँका २०.३९ टक्के, ग्रामीण बँका ६०.८९ टक्के असे तिन्ही बँकानी आत्तापर्यंत केवळ ५६ टक्के पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँका मोठ्या प्रमाणात माघारल्याचे चित्र आहे.खरीप हंगामाच्या सुरुवातीला सावकार आणि नातेवाईकांकडून कर्जाची उचल करण्यापेक्षा बँकामधून पीक कर्जाची उचल करतात. शासनाचा सुध्दा या मागील हाच हेतू आहे. त्यामुळे शासन आणि नाबार्डने यंदा बँकाना ३०३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आणि शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करताना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतर सुध्दा राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्ज वाटप करताना किचकट प्रक्रिया अवलंबली जात असल्याने शेतकऱ्यांसाठी ती त्रासदायक ठरत आहे. त्यामुळेच पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका प्रचंड माघारल्याचे चित्र आहे.दररोज आढावा, तरीही समस्याजिल्ह्यातील सर्वच बँकाकडून दररोज पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. तसेच शासनाला सुध्दा याचे अपडेट पाठविले जात आहे. मात्र यानंतरही पीक कर्ज वाटपाची उद्दिष्ट पूर्ती झालेली नाही. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेला अद्यापही ५० टक्केच्यावर आकडा गाठणे शक्य झालेले नाही. त्यामुळे दररोज आढावा घेवून सुध्दा समस्या कायम असल्याचे चित्र आहे.उद्दिष्ट कमी होण्याची शक्यतामागील वर्षी जिल्ह्याला दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने यंदा नाबार्डने ८० कोटी रुपयांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी केले. यंदा देखील तीच स्थिती असून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुन्हा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसू शकतो.राष्ट्रीयकृत बँकानी विचारमंथन करण्याची वेळजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरत आहे. तर यंदा आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. या बँकातून पीक कर्जाची उचल करण्याकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याने त्यांना विचार मंथन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज