शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नॅनो कारसह देशी दारूचा साठा जप्त

By admin | Updated: July 28, 2015 02:46 IST

ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर विजयाच्या जल्लोषासाठी जिल्ह्यात अवैधपणे दारूची वाहतूक झाली. अशाच एका

गस्तीदरम्यान नाकाबंदी : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीमगोंदिया : ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर विजयाच्या जल्लोषासाठी जिल्ह्यात अवैधपणे दारूची वाहतूक झाली. अशाच एका नॅनो कारला दि.२६ रोजी पहाटे ३ वाजता गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोरेगाव तालुक्यातील मौजा मेघाटोला येथील सिलेगाव फाट्याजवळ अडवून कारसह त्यातील दारू जप्त केली.त्या झडती घेतली असता साडेदहा पेट्या देशी दारू अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. वाहन चालक राजेश गणेशलाल जैस्वाल व प्रविण देवराव टेंभुर्णीकर दोन्ही राहणार गोरेगाव यांना जागीच अटक करुन त्याच्याविरोधात दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्यात देशी दारू फिरकी संत्राच्या १८० मिली क्षमतेच्या ५०४ बाटल्या व टाटा नॅनो कार असा ६२,९६२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता सदर देशी मद्य साठा गोरेगाव येथील आर.ओ. कावळे व आर.आर. कावळे यांच्या भागीदारीतील देशी दारू दुकानातून तेथील अधिकृत नोकरनामाधारक पुरुषोत्तम दिवाकर चौरे यांचेकडून खरेदी केल्याचे वाहन चालक राजेश जैस्वाल याने सांगितले. तसेच दुकानाच्या समोरील गल्लीत देशी दारूच्या १८० मिलीच्या ३० पेट्या, ९० मिलीच्या १ पटी व बीअरची १ पेटी असा दारूसाठा विक्रीच्या उद्देशाने ठेवला असल्याचे दिसून आले व हा साठा विभागाने जप्त केलेला आहे. देशी दारू दुकानाचे सखोल निरीक्षण करुन अवैधरित्या देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी नियमभंगाचे प्रकरण नोंदवण्यात आले. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक देवरी १ चिटमटवार, दुय्यम निरीक्षक गोंदिया शहर निकुंभ, जवान पागोटे, उके, फुंडे व वाहनचालक मडावी यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी )आतापर्यंत ४६ आरोपींना अटक४गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क गोंदिया विभागाकडून अवैध हातभट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत. जुलै महिन्यात विभागाकडून आतापर्यंत एकून ६९ गुन्हे नोंदवण्यात आले असून ४४ वारस गुन्ह्यांमध्ये ४६ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच ५३८ लिटर हातभट्टी मोहा दारू ३३२१० लिटर मोहा सडवा, २५४ लिटर देशी दारू व १ मोटरसायकल व एक टाटा नॅनो कार असा एकूण ९.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.