शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालय नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:00 IST

महसूल विभागाच्यावतीने १ नोव्हेंबर २०१७ मध्ये भरनोली तलाठी कार्यालयाचे विभाजन करुन राजोली येथे नवीन तलाठी कार्यालय सुरू केले. तहसीलदारांमार्फत १५ डिसेंबर २०१७ या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्दे१० महिने लोटूनही तलाठी नाही : नागरिकांची होत आहे फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : महसूल विभागाच्यावतीने १ नोव्हेंबर २०१७ मध्ये भरनोली तलाठी कार्यालयाचे विभाजन करुन राजोली येथे नवीन तलाठी कार्यालय सुरू केले. तहसीलदारांमार्फत १५ डिसेंबर २०१७ या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र १० महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सुद्धा साजा क्रमांक ३४ राजोली करीता तलाठी नियुक्त करण्यात आला नाही. त्यामुळे येथील तलाठी कार्यालय फक्त नावापुरतेच असून येथे त्वरित तलाठ्याची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगराळ नक्षलग्रस्त, दुर्गम परिसरातील मौजा भरनोली या ठिकाणी ७ महसूल गाव व ८ पाडे मिळून मात्र एक तलाठी कार्यालय अस्तित्वात आहे. तलाठी कार्यालय भरनोलीच्या (त.सां.क्र.२५) कार्यक्षेत्रात तिरखुरी, भरनोली, राजोली, खडकी, सायगाव, कन्हाळगाव, तुकुम, कान्हाटोली इत्यादी गावांचा समावेश होता. तलाठी कार्यालय भरनोलीपासून कन्हाळगाव ५ किमी, सायगाव ४ किमी, तुकुम ४ किमी, नवीनटोला ३ किमी अंतरावर आहे. ७/१२, नमूना-८ सारख्या महत्वपूर्ण उताऱ्यासाठी नागरिकांना ४-५ किमी ये-जा करावी लागते.ही बाब लक्षात घेत मौजा राजोली येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय स्थापन करण्यात आले. मात्र स्वतंत्र तलाठी नियुक्त करण्यात आला नाही व कार्यालय सुद्धा कार्यान्वीत करण्यात आले नाही. त्यामुळे तलाठी कार्यालय नावापुरतेच उघडले की काय? अशी चर्चा नागरिकांत रंगत आहे. महसूल विभागाच्या या कामामुळे मात्र नागरिकांची फरफट होते.त्यामुळे स्वतंत्र तलाठी नियुक्त करुन कार्यालय सुरु करावे अशी मागणी गोवर्धन पाटील ताराम, नामदेव लांजेवार, लालाजी गायकवाड, दिनेश इंदूरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.