शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजली बहेकार हिने ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर गुजराती नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी निधी किशोर भगत हिने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून चौथा क्रमांक पटकाविला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१७) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९६.७९ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजली बहेकार हिने ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर गुजराती नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी निधी किशोर भगत हिने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून चौथा क्रमांक पटकाविला आहे. मागील वर्षी दहावी परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात दुसऱ्या स्थानी होता. तर यंदा जिल्ह्याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली असून बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून ९८.२२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण १९ हजार २२८ विद्यार्थी  बसले होते. त्यापैकी १८ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९४०१ विद्यार्थी तर ९२१० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ७८३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७३९९ तर व्दितीय श्रेणीत २८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९७.७९ टक्के लागला. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात घट झाली आहे. अविशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील दीडशे शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजली बहेकार हिने ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर गुजराती नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी निधी किशोर भगत हिने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून चौथा क्रमांक पटकाविला आहे.  विशेष म्हणजे निकालाची टक्केवारी पाहता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे आहेत.

सर्वाधिक प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातगोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ४१.३७ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर नागपूर जिल्ह्यात ३७.२३ टक्के विद्यार्थ्यांना ही श्रेणी मिळाली. जिल्ह्यातील एकूण १८ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९४०१ विद्यार्थी तर ९२१० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ७८३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७३९९ तर व्दितीय श्रेणीत २८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकालात सावित्रीच्या लेकीच सरस - बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातसुध्दा सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७१ टक्के आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.४७ टक्के आहे. ९१५२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शहरापेक्षा ग्रामीण सरस - दहावीच्या निकालाची तालुकानिहाय टक्केवारी पाहिल्यास यात अर्जुनी मोरगाव तालुका सरस ठरला आहे. या तालुक्याचा एकूण निकाल ९९.२६ टक्के लागला आहे. तर उर्वरित तालुक्यांचा निकालसुध्दा सरासरी ९७ टक्के आहे. तर शहरी भागातील शाळांचा सरासरी निकाल ९६ टक्के आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातील शाळा सरस ठरल्या आहेत.

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण