शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जागांसाठी राबविणार नागपूर जिल्हा परिषदेचा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७  टक्के आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करीत ओबीसी जागा खुल्या करुन निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयाेगाला दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० अशा एकूण ३० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने आता होणाऱ्या सर्वसाधारण जागांवरील निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजातीलच उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाच्या जागा रद्द झाल्यानंतर तेथे पुन्हा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा सर्वच पक्षांनी या खुल्या जागांवर ओबीसी उमेदवारांना उमेदवारी दिली होती. आता हाच पॅटर्न १८ जानेवारीला जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राबविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७  टक्के आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करीत ओबीसी जागा खुल्या करुन निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयाेगाला दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० अशा एकूण ३० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याने संतप्त असलेला ओबीसी समाज या निवडणुकीत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही संघटनांनी आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, मतदानासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन राजकीय पक्षांच्यावतीने करण्यात येत आहे. 

ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर होत असलेल्या निवडणुकीत भाजप ओबीसी समाजातील व्यक्तींनाच उमेदवारी देणार आहे. ओबीसी समाजावर झालेला अन्याय या माध्यमातून दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. - विजय रहांगडाले, आमदार 

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल. तसेच या जागांवर ओबीसी समाजातील व्यक्तिंना उमेदवारी दिली जाईल. ओबीसी समाजबांधवांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

काँग्रेसचे आधीच ठरलेले उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून उभे राहतील. ओबीसी प्रवर्गासाठी काँग्रेसने उमेदवार निवडले होते. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल. ओबीसींवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देताना  प्राधान्य दिले जाईल. - दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद