शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठळक मुद्देवीज, पाणी, रस्त्यांसह हाताला काम द्या : बाकलसर्राचे ज्वलंत मुद्दे

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नगर पंचायतवर कुणाची सत्ता येईल, सत्तेवर आल्यास कोणत्या कामावर लक्ष देण्यात येईल, कोणकोणत्या समस्या दूर होतील, कोणाला निवडून देणे योग्य ठरेल, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.बाकलसर्रा गावातील नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ येथे जवळपास ८५ घरे आहेत. या गावातील लोक ७५ टक्के आदिवासी, मागासलेले आहेत. इतर २५ टक्के लोक पोवार, लोधी, हलबी, लोहार, एस.सी. इत्यादी जातीचे आहेत. ते काही प्रमाणात शेतीवर तर मोठ्या प्रमाणात वनोपज व मोल मजूरीवर अवलंबून आहेत. कामाअभावी येथील लोक शहराकडे पलायन करुन कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन शोधतात, हे या गावचे वैशिष्ट आहे.या गावाला भेट दिली असता दोन्ही वॉर्डांची सद्यस्थिती आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तालुका मुख्यालयापासून ५ किमी. अंतरावर असलेला प्रभाग १ आणि २ बाकलसर्रा या गावात जाताना ३ किमी. जंगलातून मार्गक्रमण करावे लागते. गावापर्यंत जाण्यासाठी पक्का डांबरीकरण रस्ता बनला आहे. परंतु त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या गावात पोहोचताच गावकरी मोठ्या उत्सुकतेने भेटून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत गावातील समस्या मांडू लागतात. दुर्गम व संवेदनशील भागात मोडत असलेला बाकलसर्रा गाव विकासाच्या प्रवाहात मुळीच आला नाही. गावातील सर्वच घरे कौलारू आहेत. आदिवासी मागासलेल्या बेरोजगार युवकांचा लोंढा या गावात आहे. लोकांचे राहणीमान पारंपरिक व मागासलेले आहे. अडीच वर्षांपूर्वी नगर पंचायत स्थापन होऊन प्रशासक बसविण्यात आले. परंतु येथे विकासाचे कोणतेच काम झाले नाही. २०० मीटर रस्ता खडीकरणाचा आहे, परंतु सदर रस्ता लवकर पक्का सिमेंटचा तयार व्हावा, अशी मागणी लोकांची आहे.गावात रस्त्याच्या एका बाजूला नाली बांधकाम झाले, ते ग्रामपंचायत असताच बनले होते. परंतु नालीचा उपसा झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्या जमिनीत गळप झाल्या आहेत. सौर उर्जेचे दिवे बंद पडले आहेत. रात्रीला या गावातील दोन्ही वॉर्डात काळोख पसरला असतो. गावात एकूण सात बोअरवेल असून उन्हाळ्यात सर्व बोअरवेल बंद असतात. गावाबाहेरील शेतात खासगी बोअरवेलच्या भरवशावर पाणी मिळवावे लागते. गावात एका ठिकाणी बोअरवेल अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. परंतु तिची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही.पुढे एका ठिकाणी नालीचा उपसा झालेला दिसला. परंतु नालीतील घाण व माती तिथेच पडून होती. प्रशासक बसल्यापासून फक्त स्वच्छ भारत मिशनच्या कामांतर्गत या गावात सार्वजनिक शौचालयांसह ९५ टक्के कुटुंबाला शौचालयांची सोय झाली आहे. काही लोक अजूनही उघड्यावरच जाणे पसंत करताना समजले. दोन ठिकाणी कचरापेट्या लागून होत्या. परंतु गावात स्वच्छतेचे प्रमाण कमी दिसून आले. पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे कायमची व्यवस्था करुन शुद्ध पाणी मिळावे, पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.