नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कअवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. सट्टा, जुगार, अवैध दारू, गांजा, नकली वस्तुचा शोध याकडे विशेष लक्ष देत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडली. अवैध व्यावसायीकांचे मुसके आवळण्याला आपले प्रथम प्राधान्य असल्याचे विनिता शाहू यांनी सांगितले.अमंलीपदार्थाच्या विळख्यात तरूण मंडळी जाऊ नये, यासाठी त्यांनी अमंलीपदार्थ विरोधात कसून कारवाई करणे सुरू केले. प्रौगंडावस्थेतील मुलींनी आकर्षणाच्या नादातून वाईट कृत्य करु नये, यासाठी त्या मुलींचे समूपदेशन करुन भरकटणाऱ्या मुलींच्या पावलांना योग्य दिशा देण्यासाठी महाराष्टÑ राज्य महिला आयोग व स्वयंसेवी संस्था यांच्या पुुढाकाराने त्यांनी उडाण प्रकल्प उभारुन त्या प्रकल्पाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचे समूपदेशन करीत त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे काम पोलीस विभागाकडून करण्यात येईल, असे सांगितले. मुलींच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर दिला. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी दोषसिद्धी कक्षामार्फत न्याय प्रक्रियेकडे लक्ष देणे, अवैध रेती प्रकरण असो, प्राणी संरक्षण असो किंवा अवैध दारु विक्रीवर आळा घालण्यासाठी जोमाने प्रयत्न करुन अनेकांना तुरुंगाची हवा दाखविण्याची तयारी दर्शविली आहे. २०१० मध्ये भारतीय पोलीस सेवेत केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड झालेल्या विनिता शाहू यांनी शेजारच्या भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे २०१५ ला हातात घेतले. फोफावलेल्या सट्टा, जुगार, दारु यावर अंकुश लावून कुख्यात गुन्हेगारांचे मुसके आवळले.राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी त्यांनी उत्तम उपाययोजना केली. आपले प्रशासन लोकाभिमुख राहावे, यासाठी फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना भंडारा जिल्ह्याच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यात लवकरच सुरू करणार असल्याचे त्या म्हणाल्या. पोलीसांच्या कल्याणासाठी कल्याण निधी वाढविण्यासाठी उत्तम योजना आखली. पोलीस कर्मचाऱ्यांना व जनतेला हेल्मेट सक्ती केली. ही सक्ती नसून नागरिकांच्या जिवाची पर्वा करण्यासाठी उचललेले पाऊल आहे. अधिकारी, कर्मचारी यांचा वाढदिवस, त्यांच्या पाल्यांचा वाढदिवस साजरा करण्याची भूमिका घेत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील महिलांवर अत्याचार होणार नाहीत. शांतीतून गोंदियाला समृध्दीकडे नेण्यासाठी आपण कटीबध्द आहोत पोलिसांना सहकार्य करून पोलिसांची मदत घ्या असे आवाहन त्यांनी मुलाखतीतून केले आहे.
अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटणच माझे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 9:34 PM
अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. सट्टा, जुगार, अवैध दारू, गांजा, नकली वस्तुचा शोध याकडे विशेष लक्ष देत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडली.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक विनीता शाहू : गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’