शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माय बाय म्हणते अभ्यास कर, मोदी सरकार म्हणते पकोडे तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:27 IST

मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्हा सर्वांची एकच भूल कमळाचे फुल, माय बाय म्हणते अभ्यास कर अन मोदी सरकार म्हणते पकोडे तळ, .....

ठळक मुद्देबेरोजगारांचे आक्रोश आंदोलन : रेल्वेस्थानक व्यवस्थापकांना निवेदन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्हा सर्वांची एकच भूल कमळाचे फुल, माय बाय म्हणते अभ्यास कर अन मोदी सरकार म्हणते पकोडे तळ, अशा घोषणा देत बेरोजगार युवकांनी शुक्रवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील तहसील कार्यालय येथून गोरेलाल चौकातील रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढला. यात शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक सहभागी झाले. या वेळी युवकांनी सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला.रेल्वे स्पर्धा परीक्षार्थ्यांवर होणाºया अन्यायाविरोधात बेरोजगार युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी आक्रोश आंदोलन व रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हाभरातील युवक यात सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा रेल्वे कार्यालयाजवळ पोहचला. मोर्च्यात सहभागी युवकांनी सरकार आणि रेल्वे बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन रेल्वेस्थानक व्यवस्थापक रवी नारायणकार यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून रेल्वे भर्ती बोर्डाच्या गु्रप डी पदाच्या होणाºया भर्तीतून आयटीआय अनिवार्यची अट रद्द करावी, कमीत कमी योग्यता दहावी ठेवण्यात यावी, परीक्षा शुल्क ५०० रूपये चालान स्वरूपातील शुल्क वाढ मागे घेवून नि:शुल्क अर्ज स्वीकारण्यात यावे, रेल्वे भर्ती बोर्डाद्वारे दरवर्षी रोजगार भर्ती प्रक्रिया अनिवार्य करावी, एमपीएससी, यूपीएससी, शिक्षक भर्ती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, परीक्षेनंतर सहा महिन्यात भर्ती पूर्ण करावी, महिलांसाठी लागू केलेली शारीरिक चाचणीची अट रद्द करुन पूर्वीप्रमाणेच भर्ती प्रक्रिया घेण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.शिष्टमंडळात रुपेश डोंगरे, उमेश कांबळे, नितीन टेंभुर्णीकर, चेतन मेश्राम, मिथुन बागडे, प्रणय दरवडे, देवांत गजभिये, प्रितम बागडे, विनीत शहारे, शैलेश टेंभेकर, मयुर मेश्राम, कुणाल राऊत, विलास राऊत, धीरज मेश्राम, डी.एस.मेश्राम, देवेश शेंडे, स्वप्नील डहाटे, अक्षय सहारे, चेतन मेश्राम, अमन मेश्राम, विवेक बन्सोड, प्रितेश नारनवरे यांचा समावेश होता. युवकांच्या आंदोलनाला शहरातील शारदा वाचनालय, शासकीय वाचनालय, आज्ञाद लायब्ररी, स्वामी विवेकानंद लायबरी, युथ स्टडी पार्इंट अ‍ॅन्ड फास्ट्रक इंग्लिश अ‍ॅकडमी यांनी सहकार्य केले.