शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार एप्रिलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2024 05:00 IST

जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडासह नवनिर्मित आमगाव नगरपरिषदेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये गठित करण्यात आलेल्या या नगर परिषदेच्या निवडणूक अधिसूचनेवर आक्षेप घेतल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशावर जिल्हाधिकारी यांनी प्रकिया रद्द केली होती. शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली असून, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलबिंत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील मुदत संपलेल्या वा लवकरच मुदत संपणार असलेल्या २०८ नगरपालिकांमध्ये निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम मंगळवारी (दि. २२) जाहीर केला. तो लक्षात घेता एप्रिलच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडासह नवनिर्मित आमगाव नगरपरिषदेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये गठित करण्यात आलेल्या या नगर परिषदेच्या निवडणूक अधिसूचनेवर आक्षेप घेतल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशावर जिल्हाधिकारी यांनी प्रकिया रद्द केली होती. शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली असून, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलबिंत आहे. निवडणूक आयोगाने मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून या नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेला मंजुरी दिल्याने आमगाव नगरपरिषदेची निवडणूक सुद्धा सोबतच होण्याचे संकेत दिले जात आहे. सोबतच गोरेगाव नगरपंचायतीची निवडणूकसुद्धा होणार आहे. 

 १ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मान्यता - नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील. त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील. त्यावर जिल्हाधिकारी २२ मार्च रोजी सुनावणी देतील. २५ मार्चपर्यंत आयोगाला अहवाल देतील. १ एप्रिलपर्यंत आयोग अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देईल. त्याच सुमारास अनुसूचित जाती, जमाती आणि महिला आरक्षण जाहीर केले जाईल. 

२० एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर निवडणूक आयोग विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या आधारे प्रभागांची मतदार रचना जाहीर करेल व त्यावर हरकती व सूचना मागविल्या जातील. ही प्रक्रिया साधारणत: १८ ते २० एप्रिलदरम्यान पूर्ण होईल व त्यानंतर आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल.

 

टॅग्स :Electionनिवडणूक