शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

जिल्ह्यातील ४०० तलावांतून काढणार गाळ

By admin | Updated: May 21, 2017 01:48 IST

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ह्या योजनेला लोकसहभागातून राबविले जाणार आहे.

लोकसहभागातून होणार काम : गाळ नसलेल्या तलावातील गौण खनिज चोरी? लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ह्या योजनेला लोकसहभागातून राबविले जाणार आहे. शासनाकडून कवडी न देता सिंचन क्षमता वाढविण्याचा शासनाचा माणस दिसते. परंतु गाळ काढण्याच्या नावावर तलावातून निघणारी माती, मुरूम विकल्या तर जाणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील ४०० तलावांतून या वर्षात गाळ काढले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अभियान असे सांगून गाळमुक्त तलाव करण्याचा माणस शासनाचा उत्तम आहे. परंतु या अभियानांतर्गत तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात नेला जाईल का? लघु पाटबंधारे विभागाच्या मार्फत राबविण्यात येणारे मामा तलाव पुनरूजीवन या योजनेतील गौण खनिजाची जशी चोरी होते. त्या धर्तीवर गाळयुक्त तलाव गाळमुक्त करण्याचा माणस नाही ना अशी शंका येते. गोंदिया जिल्हा हा तलावांचा आहे. प्रत्येक गावाच्या आजुबाजूला २ ते ४ तलाव आहे. अनेक वर्षापासून हे तलाव गाळाने भरले आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यात बहुतांश तलावांमध्ये मुरूमही आहे. गाळ काढण्याच्या नावावर गौण खनिज चोरी तर होणार नाही ना? याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. गाळ सुपीक असून खत म्हणून या गाळाची उपयुक्तता मोठी आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी गाळ उपयुक्त ठरणार आहे. परंतु तलावातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात जायला हवे. शेतकऱ्यांनी तलावातील गाळ काढून आपल्या शेतात नेण्याचे काम करणे गोंदिया जिल्ह्यात अवघड दिसत आहे. शासनाने ० ते १०० हेक्टर व १०० ते २५० हेक्टर असलेल्या तलावातील गाळ काढण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु या योजनेवर खर्च करण्यासाठी शासनाने एकही पैसे न देता लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम करावे असे सूचविण्यात आले. त्यामुळे गाळमुक्त तलाव हे अभियान यशस्वी होईल का यावर प्रश्नचिन्ह आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी गौण खनिज चोरी केल्याशिवाय अभियान यशस्वी होऊ शकत नाही. जिल्ह्यातील शेतकरी तलावातून गाळ काढून आपल्या शेतात न्यायचे कसे हा पहिला प्रश्न त्यांच्या पुढे येणार आहे. त्यामुळे पहिल्याच प्रश्नाने शेतकरी याकडे दुर्लक्ष करणार आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एखाद्या जेसीबी मालकाला गाळ काढण्यासाठी जेसीबीने खोदकाम करायला बाध्य केले तर त्या तलावातून निघणारा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात जाईल का? तलावातून निघणारा मुरूम ग्राम पंचायतच्या हद्दीत मोफत टाकला जाईल तरच हा अभियान यशस्वी होईल. गोंदिया जिल्ह्यात लघु सिंचन विभागाचे १४२१ मामा तलाव व १९० तलाव आहेत. लोकल सेक्टर जलसंधारणाचे २९ तलाव असून त्यातील २४ तलाव १०० हेक्टरच्या आत आहेत. जलसंपदा विभागाकडे ३८ तलाव असून त्यातील ६ तलाव २५० हेक्टरच्या वर आहेत. तर ३२ तलाव २०० हेक्टरच्या आत आहेत. गाळमुक्त तलाव करण्यासाठी तलावाचे खोलीकरण मोफत कुणीही करणार नाही अशी मानसिकता दिसून येते. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा व गोंदिया या प्रत्येक तालुक्यात ५०-५० तलावातून गाळ काढले जाणार आहे.