शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने वीज चोरांवर आवळला कारवाईचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:32 IST

वीज चोरीच्या प्रकारांवर अंकुश बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात सातत्याने मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यात वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत. विशेष म्हणजे, यातील २३१ प्रकरणांत वीज विभागाने ३२.२० लाखांची वसुली केली आहे. वीज वितरण कंपनीसाठी वीज चोरी ही एक गंभीर समस्या झाली आहे.

ठळक मुद्देवीज चोरीची ३९० प्रकरणे : ३२.२० लाखांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज चोरीच्या प्रकारांवर अंकुश बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात सातत्याने मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यात वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत. विशेष म्हणजे, यातील २३१ प्रकरणांत वीज विभागाने ३२.२० लाखांची वसुली केली आहे. वीज वितरण कंपनीसाठी वीज चोरी ही एक गंभीर समस्या झाली आहे.यामुळे गोंदिया जिल्हा वरिष्ठांच्या नेहमीच नजरते राहतो. याकडे लक्ष देत जिल्ह्यात सातत्याने वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाही केली जात आहे. जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ९० लाख २५ हजार ९२४ युनिट म्हणजेच ४६ लाख ८७ हजार रूपयांची वीज चोरी झाल्याची माहिती आहे.यात गोंदिया विभागात ८८ लाख ३१ हजार ७१६ युनिट वीज चोरी झाली आहे. तर देवरी विभागात १ लाख ९४ हजार २०८ युनिट वीज चोरी झाली आहे. वीज वितरण कंपनीने राबविलेल्या मोहिमांदरम्यान वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत.यातील २३१ प्रकरणांतील ४ लाख २८ हजार ५३६ युनिटच्या चोरीची ३२.२० लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.वीज चोरीवर आळा बसावा यासाठी वीज कंपनीकडून कित्येक जागांवर एरीअर बंच केबल टाकण्यात आले आहेत.तसेच भरारी पथक कारवाया करीत असताना येथील कर्मचारी मोहिमांत भाग घेत आहेत.१९ अवैध कनेक्शन पकडलेमहावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ५६९ वीज कनेक्शन्सची तपासणी केली. यातील १९ प्रकरणांत कनेक्शन अवैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कनेक्शनधारकांकडून ३२ हजार १९ युनिट वीज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ५ कनेक्शनधारकांकडून ३ हजार ७६ युनिटची रक्कम वसुल करण्यात आली आहे.आकडा टाकून १०.२१ लाखांची वीज चोरीजिल्ह्यात आकडा टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. मागील ६ महिन्यांत ६११ कनेक्शनची तपासणी केली असता त्यात २३९ प्रकरणांत आकडा टाकून वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी १ लाख ३५ हजार ७७२ युनिटची १०.२१ लाखांची वीज चोरी केली. यातील ६.२१ लाख रूपये संबंधींताक डून भरण्यात आले असून ४ प्रकरणांत मात्र पोलीस तक्रार करण्यात आली आहे.मीटरमध्ये छेडछाडची १४० प्रकरणेवीज बिल कमी यावे यासाठी मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे गोंदिया विभागात ८३ तर देवरी विभागात ५७ प्रकरण नोंद करण्यात आले आहे. त्याचप्रकारे गोंदिया विभागात १८.४१ लाख व देवरी विभागात ९.४५ लाख म्हणजेच एकूण २७.८६ लाख रूपयांची चोरी पकडण्यात आली आहे. यात ४ लाख ५९ हजार २११ युनिट वीज चोरीचे प्रकरण असून ३ लाख ५९ हजार ८६३ युनिटची रक्कम वसुल करण्यात आली आहे.वीज चोरीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविली जाते. याशिवाय पूर्ण वर्ष वीज चोरी थांबविण्यासाठी प्रत्येकच कर्मचारी काम करतात.- ओ.के.बारापात्रे, अधीक्षक अभियंता, महावितरण, गोंदिया