शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यावर एमपीडीएची कारवाई ; लोकांमध्ये होती दहशत

By नरेश रहिले | Updated: February 15, 2025 19:05 IST

Gondia : काय आहे एमपीडीए कायदा?

गोंदिया: जिल्हा पोलीस प्रशासनाची हातभट्टी दारू निर्मिती/ विक्री करणाऱ्या धोकादायक गुंडाविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी कायद्यान्वये स्थानबध्दतेचे आदेश दिलेत. राहुल भजनदास गेडाम (२५) रा. आसोली (गोंदिया) याला एका वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे केले स्थानबद्ध केले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीणचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक समीर महेर यांनी आसोली येथील राहणारा धोकादायक गुंड राहुल भजनदास गेडाम (२५) याच्याविरुद्ध एमपीडीए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यानुसार प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्फतीने पोलीस अधीक्षकांनका पाठविला होता. गोंदिया येथील प्रतिबंधक सेलद्वारे तयार करून पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंडा इसमाविरूद्ध एमपीडीए कायद्याचे कलम ३ (१) अन्वये १४ फेब्रुवारी रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 

लोकांमध्ये होती दहशतआरोपी राहुल भजनदास गेडाम (२५) रा. आसोली या धोकादायक गुंडाविरूध्द हातभट्टी दारू निर्मितीचे, विक्रीचे गुन्ह्याची नोंद आहेत. त्याच्यावर वारंवार कारवाई करून सुद्धा त्याच्या चरित्रात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्याचे वागण्यामुळे जनसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

काय आहे एमपीडीए कायदा?महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृष्यश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबत अधिनियम-१९८१ म्हणजेच एमपीडीए कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी) आहे. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

टॅग्स :gondiya-acगोंदिया