शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य खरेदीसाठी सुरू झाल्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:54 IST

महिना लोटूनही नगर परिषद कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी ‘चिमुकल्यांच्या हाती काहीच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते.

ठळक मुद्देकॉन्व्हेंट व शाळांसाठी खरेदी होणार : नगर परिषद काढणार ई- निविदा

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिना लोटूनही नगर परिषद कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी ‘चिमुकल्यांच्या हाती काहीच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. याची दखल घेत नगर परिषद प्रशासन कामाला लागले असून कॉन्व्हेंटसह शाळांतील साहित्य खरेदीसाठी हालचाल सुरू केली आहे. नगर परिषद साहित्यांची यादी तयार करीत असून खरेदीसाठी ई- निविदा काढणार आहे.नगर परिषदेने मागील वर्षापासून शहरातील त्यांच्या शाळांना जोडून ११ कॉन्व्हेंट सुरू केले. शहरातील गरीब परिवारातील चिमुकल्यांना चांगले शिक्षण मिळावे. या दृष्टीकोनातून केलेला हा प्रयोग प्रशंसनीय आहे. नगर परिषदेच्या या प्रयोगाला दाद देत शहरातील सुमारे २५० चिमुकल्यांचा प्रवेशही पहिल्याच वर्षी झाला होता. मागील वर्षी नगर परिषदेकडून कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांना गणवेश, वह्या-पुस्तके, जोडे-मोजे यासह अन्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले होते.नगर परिषदेने दिलेल्या आश्वासनांपेक्षा कमीच साहित्य चिमुकल्यांना वाटप केले होते, मात्र त्यालाही उशीर झाला होता. यंदाही तीच स्थिती कायम होती. शाळांना सुरूवात होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यावरही कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांना आतापर्यंत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे सध्या या चिमुकल्यांना कॉन्व्हेंटमध्ये या आणि जा असाच दिनक्रम सुरू आहे. कॉन्व्हेंटसाठी शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली. यातील काही शिक्षिका चिमुकल्यांना थोडफार शिकवित असल्याची माहिती आहे. मात्र असे असतानाही या चिमुकल्यांकडे वह्या-पुस्तके व गणवेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चिमुकल्यांना सर्व साहित्य नगर परिषद देणार असे आश्वासन देऊनच कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले. मात्र आतापर्यंत चिमुकल्यांच्या काही काहीच दिले नाही. यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर नगर परिषद प्रशासन खरेदीसाठी धावपळ करीत आहे.कॉन्व्हेंटसह शाळांसाठी साहित्य खरेदी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार, तयारी सुरू असून लवकरच ई-निविदा काढली जाणार आहे. मात्र याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संबंधिताला दिले नोटीस‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित कर्मचाºयाला बोलावून याचा जाब विचारल्याची माहिती आहे. यासाठी त्यांना नोटीसही देण्यात आल्याची चर्चा सध्या नगर परिषद वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच सध्या साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरू असून निविदा काढली जाणार आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आली होती.त्यात चांगलेच राजकारण झाले होते. त्यामुळे खरेदीला घेऊन काहींच्या नजरा लागल्या आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSchoolशाळा