शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा न.पं.च्या निवडणुकीसाठी हालचाली

By admin | Updated: March 11, 2017 00:17 IST

सालेकसा ग्राम पंचायत बरखास्त करुन मागील दोन वर्षापासून प्रशासक नसलेल्या नगर पंचायत सालेकसाला आतापर्यंत

मतदारयादीचा सुधारित कार्यक्रम : आमगाव खुर्दचा समावेश नसल्याने अडचणीची शक्यता सालेकसा : सालेकसा ग्राम पंचायत बरखास्त करुन मागील दोन वर्षापासून प्रशासक नसलेल्या नगर पंचायत सालेकसाला आतापर्यंत लोकशाही पद्धतीने सरकार मिळाले नाही. निवडणूक आयोगाने आता सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सुद्धा नगर पंचायतीत समाविष्ठ करावे म्हणून मागील वर्षी निवडणुकीवर स्थगिती आणण्यात आली होती. परंतू आतापर्यंत आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे फक्त सालेकसाची निवडणूक घेणार, की पुन्हा स्थगिती आणून आमगाव खुर्दला नगर पंचायतीत सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, याबद्दल पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. नगर पंचायत सालेकसा येथे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात मतदार याद्यांच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. परंतु दुसरीकडे आमगाव खुर्दला समाविष्ट न केल्यामुळे पुन्हा आमगाव खुर्दवासीय अस्वस्थ झाले आहेत. काही लोक पुन्हा कोर्टात धाव घेण्याच्या तयारीला लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी) निवडणूक आयोगाला अवमानना नोटीस गुरुवार ९ मार्चला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात नगरविकास सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर आणि निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांना अवमानना नोटीस बजावली आहे. २०१५ ला आमगाव खुर्द येथील ग्रा.पं.सदस्य ब्रजभूषण बैस आणि वासुदेव चुटे यांनी आमगाव खुर्द ग्रामपंचायतीला सालेकसा नगर पंचायतीत समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या आधारावर न्यायालयाने सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्यावर स्थगिती आणून आमगाव खुर्दचा न.पं.मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया करुन निवडणूक घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु शासनाने न्यायालयाच्या त्या सल्ल्यावर अंमलबजावणी न करता पुन्हा फक्त सालेकसाला नगर पंचायत बनवून निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे न्यायालयाने दोघांना अवमानना नोटीस बजावली आहे. आता नगर पंचायत सालेकसाची निवडणूक होणार की आमगाव खुर्दला समाविष्ट करणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. असा आहे कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ८ मार्च २०१७ रोजी निगर्मित केलेल्या आदेशाप्रमाणे सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० मार्च २०१७ ला प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, १० मार्च ते १६ मार्चदरम्यान प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची संधी देणे, १८ मार्चला प्रभागनिहाय अंतीम मतदार याद्या तयार करणे आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे, २० मार्च रोजी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे असा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.