शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला ! कोवळी लेकरं अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 12:46 IST

Gondia News सहा महिन्यांपूर्वी आई गेली. आईच्या मृत्यूचे दुःख पचवून बाप आईची माया देत होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. महिनाभरापूर्वी कोरोनाने त्यालाही हिरावून घेतले. आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्यावर आली.

ठळक मुद्दे सहा महिन्यात जन्मदात्यांचा मृत्यू

संतोष बुकावन

 लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया  : सहा महिन्यांपूर्वी आई गेली. आईच्या मृत्यूचे दुःख पचवून बाप आईची माया देत होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली कुणास ठावूक. महिनाभरापूर्वी कोरोनाने त्यालाही हिरावून घेतले. अगदी खेळण्या- बागडण्याच्या वयात त्या कोवळ्या लेकरांवर संसाराची धुरा सांभाळण्याची वेळ येऊन ठेपली. शेवटी आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्या बहिणींवर आली.

            मोठी सलोनी पंधरा वर्षांची, प्रतीक्षा बारा वर्षांची, तर प्रियांशू अवघ्या अडीच वर्षांचा. तिघांच्याही वाट्याला अनाथाचं जगणं आलं. पोटाला चिमटा देत लेकींना घडवायचं. आपल्या नशिबी आलेलं दारिद्र्‌य त्यांच्या वाट्‌याला येऊ नये यासाठी त्यांना शिकवून पायावर उभं करायचं त्याचं स्वप्न होतं. दोन्ही लेकींना गावातीलच एका नामांकित शाळेत टाकलं. हे स्वप्न पडत असतानाच ते क्षणात विखुरतील, अशी कल्पना आप्तेष्टांनीही केली नव्हती. पण अखेर नियतीसमोर कुणाचंच चालेना. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

अर्जुनी मोरगाव येथे एका टपरीत रामदास कोलते याचे दुचाकी दुरुस्तीचे दुकान होते. दुचाकी दुरुस्तीवर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पत्नीच्या हृदयाचे व्हॉल्व निकामी झाले. शस्त्रक्रिया केली. ५ डिसेंबर २०२० ला तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या उपचारासाठी बराच पैसा खर्च झाला. या धक्क्यातून सावरत असतानाच कोरोना आला. रामदासला कोरोनाची लागण झाली. त्याला स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. येथून ब्रम्हपुरीच्या ख्रिस्तानंद खासगी रुग्णालयात हलविले. पण कोरोनातून सुटका झाली नाही. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. अखेर २७ मे रोजी रामदासचीही प्राणज्योत मालवली.

रामदाससाठी बराच खर्च करावा लागला. त्या तिघांचे आधारवडच निघून गेले. सहा महिन्यांच्या आत जन्मदात्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यांच्या पालनपोषणासाठी म्हातारे आजी-आजोबा धावून आले. अडीच वर्षाच्या प्रियांशूला कळत नाही, पण सलोनी व प्रतीक्षा यांना जबर धक्का बसला आहे. रामदासच्या उपचारासाठी वृद्ध आई-वडिलांनीच खर्च केला. ते कर्जबाजारी झाले. रामदासच्या वडिलांची पाच एकर शेती आहे. यात म्हातारे व तीन भावंडांच्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्याचे मोठे आव्हान या वृद्धांवर आहे. त्या भावंडांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा वृद्ध आजोबांनी सदर प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.

बँकेतील पैसे देण्यास नकार

            रामदासची तिन्ही मुलं अवयस्क आहेत. यापुढे आजोबाच त्यांचं पालनपोषण करणार आहेत. रामदासने काटकसर करून बँकेत काही पैसे जमा केले. पण वारसदार अवयस्क असल्याने बँकेने पैसे देण्यास नकार दिला. कोरोना उपचारासाठी म्हाताऱ्या वडिलांचेही बरेच पैसे गेले. आता या तिघांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली. पुढे कसे करायचे, हे त्यांना सुचेनासे झाले आहे. तसेच त्या तीन भावंडांना, आई गेली-बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू