शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

मुंबई,हावडा मार्गावरील गाड्यात सर्वाधिक वेटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:30 IST

रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत काही गाड्यांमध्ये वेटींगची स्थिती राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून रेल्वेची प्रवासी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही तर कोरोना संसर्गात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याने मे आणि जून महिन्यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये फारसे वेटींग नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सद्यस्थितीत आठवड्यातून २२० रेल्वे गाड्या धावत आहेत. 

ठळक मुद्देकोरोना काळातही रेल्वे गाड्या फुल : काही गाड्यांमध्ये एप्रिल अखेरपर्यंत वेटींग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मागील दहा पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे याचा प्रवासी वाहतुकीवर सुध्दा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र रेल्वे गाड्यांमध्ये वेटींग कायम असल्याचे चित्र आहे. आझाद हिंद एक्सप्रेस, गीताजंली, हावडा-मुंबई मेल, जनशताब्दी, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये शंभर दीडशेपर्यंत वेटींग लिस्ट आहे. सर्वाधिक वेटींग ही मुंबई-हावडा मार्गावरील गाड्यांमध्ये आहे. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत काही गाड्यांमध्ये वेटींगची स्थिती राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून रेल्वेची प्रवासी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही तर कोरोना संसर्गात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याने मे आणि जून महिन्यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये फारसे वेटींग नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सद्यस्थितीत आठवड्यातून २२० रेल्वे गाड्या धावत आहेत.  

हावडासाठी वेटींग, पुणेसाठी नो वेटींग कोरोनाचा संसर्ग सुरु असला तरी प्रवासी सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेलाच महत्व देत असल्याचे चित्र  आहे. कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील कामगार मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी जातात. होळी सणानिमित्त सध्या ते गावाकडे परतत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. 

परीक्षेनंतरही नो हाऊसफुल यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल ते मे महिन्या दरम्यान होणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस परीक्षा संपणार आहेत. यानंतर बहुतेक जण बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात. त्यामुळे परीक्षेनंतर रेल्वे गाड्यांमध्ये वेटींग लिस्ट भरपूर असते. पण यंदा कोरोनामुळे रेल्वे गाड्यांमध्ये फारशी वेटींग नसल्याचे चित्र आहे. 

दररोज धावतात ४२ रेल्वे गाड्याहावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक प्रमुख स्थानक आहे. लॉकडाऊनपूर्वी या रेल्वे स्थानकावरुन दररोज ७५ हून अधिक रेल्वे गाड्या धावत होत्या. तर सद्यस्थितीत या रेल्वे स्थानकावरुन ४२ गाड्या धावत आहे. गाेंदियावरुन सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सध्या तरी वेटींग नसल्याने प्रवाशांना त्रास होत नसल्याचे चित्र आहे. आझाद हिंद एक्सप्रेस, मेल, गीतांजली, जनशताब्दी, हावडा-पुणे, हावडा-मुंबई याच रेल्वे गाड्यांमध्ये सद्यस्थितीत अधिक वेटींग आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे