गोंदिया : खाणकाम योजनेतून दगड गिट्टी, मुरूम, विटामाती व मातीचा उपसा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म कार्यालयात प्रस्ताव पाठविले जातात. यात एकूण १४३७ प्रस्ताव ुजिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले. तर या सर्वच प्रस्तावांना विभागाकडून मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे. या योजनेतून गोरेगाव तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव आले असून त्या सर्व प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली आहे.खाणकाम योजनेत ५०० ब्रॉसपर्यंत उपसा करण्याच्या परवानगीची जबाबदारी तहसीलदारांकडे असते. ५०० ते दोन हजार ब्रॉसपर्यंतची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तर त्यापेक्षा जास्त ब्रॉसची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असते. गोरेगाव तालुक्यातून दगड गिट्टीचे ५७, मुरूमाचे २१७, विटामातीचे ५५ असे एकूण ३२९ प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले होते. या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. आलेल्या प्रस्तावांमध्ये इतर तालुक्यांपेक्षा सर्वाधिक प्रस्ताव गोरेगाव तालुक्याचे आहेत.गोंदिया तालुक्यातून मुरूमाचे ५९, विटामातीचे ३० व मातीचा एक असे एकूण ९० प्रस्ताव असून ते सर्व मंजूर करण्यात आलेले आहे. तिरोडा तालुक्यातून मुरूमाचे ८६ व विटामातीचे २१ असे एकूण १०७ प्रस्ताव असून त्या सर्वांना मंजुरी मिळाली आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातून दगड गिट्टीचे ३४, मुरूमाचे ८९, विटामातीचे ४० तर मातीचे १११ प्रस्ताव असून तेवढेच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. देवरी तालुक्यातून दगड गिट्टीचे १९, मुरूमाचे ३५, विटामातीचे ५६ असे एकूण ११० प्रस्ताव असून मंजूर आहेत. आमगाव तालुक्यातून दगड गिट्टीचे १२, मुरूमाचे १६९ व विटामातीचे ३४ असे एकूण २१५ प्रस्ताव मंजूर आहेत. सालेकसा तालुक्यातील दगड गिट्टीचे १३, मुरूमाचे २४ व विटामातीचे २१ असे एकूण ५८ प्रस्ताव मंजूर आहेत. तर सडक/अर्जुनी तालुक्यातून दगड गिट्टीचे २५, मुरूमाचे ५९, विटामातीचे ३४ तर मातीचे ६६ असे एकूण १८४ प्रस्ताव असून ते सर्व मंजूर करण्यात आले आहेत.याशिवाय गोंदिया, देवरी, तिरोडा उपविभागीय अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी गोंदिया यांच्या अधिकार क्षेत्रात प्राप्त काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. यात गोंदिया उपविभागीय अधिकारी अंतर्गत चार मुरूमाचे, ४२ विटामातीचे असे एकूण ४६ प्रस्ताव, देवरी उपविभागीय अधिकारी अंतर्गत विटामातीचे २० प्रस्ताव, तिरोडा उपविभागीय अधिकारी अंतर्गत शून्य तर जिल्हा खनिकर्म अधिकारी अंतर्गत मुरूमाचे चार प्रस्ताव असून ते सर्व मंजूर करण्यात आले आहेत. अशाप्रकारे गोंदिया जिल्ह्यात दगड गिट्टीचे १६०, मुरूमाचे ७४६, विटामातीचे ३५३ तर मातीचे १७८ असे एकूण एक हजार ४३७ प्रस्ताव असून ते सर्व मंजूर करण्यात आले आहेत. सदर मंजुरी २८ फेब्रुवारी व २४ मार्च २०१४ रोजी मिळालेली असून यात ३० आॅगस्ट २०१४ पर्यंतची माहिती आहे.
खाणकाम योजनेत सर्वाधिक प्रस्ताव गोरगाव तालुक्यातून
By admin | Updated: November 2, 2014 22:37 IST