शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक नफा देणारी गोंदिया-लांजी बस फेरी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:23 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून रापचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र रापचे अधिकारी, पर्यवेक्षक खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून स्वत:चा लाभ करुन घेत असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देसंगनमताचा संशय : अधिकारी व खासगी वाहतूकदारांचे साटेलोटे?

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून रापचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र रापचे अधिकारी, पर्यवेक्षक खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून स्वत:चा लाभ करुन घेत असल्याचा आरोप आहे. यातूनच इतर फेºयांच्या तुलनेत अधिक नफा देणारी गोंदिया-रजेगाव-लांजी फेरी बंद करण्यात आल्याचा आरोप नरेश जैन यांनी केला आहे.गोंदिया-आमगाव-लांजी या फेरीचे परिवहन आयुक्तांकडून (मुंबई) मिळालेल्या चार परवान्यावर राप विभागीय कार्यालय भंडाराने सदर मार्गावर बसफेरी सुरू न करता परिवहन आयुक्त कार्यालय ग्वालीयरकडून (म.प्र.) स्वत:हून अर्ज देवून चारही परवाने निरस्त करवून घेतले. यात लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी केला आहे. सदर चारही परवाने खासगी वाहतूकदाराला मिळाले असून त्यांच्या बसफेºया सदर मार्गावर सुरू आहेत.त्यामुळेच ही बाब स्पष्ट होत आहे. महत्वाचे म्हणजे राप बसफेरी बंद करण्याबाबत कोणत्याही संबंधित कार्यालयाचे आदेश नसताना सदर फेरी बंद करण्यात आली आहे. याबाबत जैन यांनी अनेकदा परिवहन आयुक्त कार्यालय मुंबईचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक (वाहतूक) रा.प. मुंबई, परिवहन मंत्री, मुख्यमंत्री व विभाग नियंत्रक भंडारा यांना तक्रार देवून चौकशीची मागणी केली. मात्र त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून कोणत्याही कार्यालयाने दखल घेतली नाही.भंडारा विभागातील सर्वाधिक भारमान देणारी गोंदिया-रजेगाव-लांजी ही फेरी अधिकृत परवाना असताना व परिवहन आयुक्त ग्वालीयर यांनी सदर फेरीचा परवाना ३० मार्च २०१२ रोजी मंजूर केला होता. त्याची मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत होती. नियमानुसार सदर परवान्यावर परवाना प्राप्त झाल्यापासून १२० दिवसांत वाहतूक सुरू करणे गरजेचे होते. मात्र रा.प. भंडारा विभागाने दुसºयाच दिवशी १ एप्रिल २०१२ पासून वाहतूक सुरू केली होती.त्यानंतर परिवहन आयुक्त मुंबई यांनी कोणतीही सहनिशा न करता ३१ मे २०१३ रोजी सदर फेरीचा परवाना रद्द केला. भंडारा विभागाने या रद्द परवान्यावर वाहतूक सुरूच ठेवली. तसेच ग्वालीयरच्या आयुक्त कार्यालयाने या परवान्याचा प्रवासी कर बरोबर प्रत्येक महिन्याला भंडारा विभागाकडून आगावू स्वीकारला.यात परिवहन आयुक्त कार्यालय ग्वालीयरची चूक नसून या परवान्याची प्रतिस्वाक्षरी मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत वैध असल्यामुळे त्यांनी नियमानुसार प्रवासी कर स्वीकारला. जर मुंबईच्या आयुक्त कार्यालयाने ३१ मे २०१३ रोजी सदर परवाना रद्द केला तर त्याची सूचना त्वरित परिवहन आयुक्त ग्वालीयर यांना देणे गरजेचे होते. परंतु कोणतीच सूचना न देता सदर परवाना मुंबई आयुक्त कार्यालयाने खासगी वाहतूकदारास दिला.१० दिवसांच्या प्रवाशी कराचे नुकसानसदर प्रकरणात गोंदियाचे तत्कालीन आगार व्यवस्थापक, तत्कालीन विभागीय वाहतूक अधिकारी राप भंडारा, तत्कालीन विभाग नियंत्रक व वाहतूक विभागातील पर्यवेक्षक यांनी खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून, आर्थिक साटेलोटे करून वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना सदर मार्गावरील फेरी २२ मार्च २०१६ रोजी बंद केली. विभाग नियंत्रक भंडारा यांनी परिवहन आयुक्त ग्वालीयर यांना ३० मार्च २०१६ रोजी अर्ज सादर करून सदर परवाना १ एप्रिल २०१६ पासून निरस्त करवून घेतला. या फेरीचा प्रवासी कर ३१ मार्च २०१६ पर्यंतचा भरणा करण्यात आला असता. मात्र त्यापूर्वीच १० दिवसअगोदर अकारण फेरी बंद करून रामच्या १० दिवसांच्या प्रवासी कराचे नुकसान करण्यात आले.जैन यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षपरिवहन आयुक्त मुंबई यांच्या १८ डिसेंबर २०१५ च्या नुसार, गोंदियाचे तत्कालीन आगार व्यवस्थापक यांनी वरिष्ठांची दिशाभूल करून सदर फेरी बंद करण्याचे षडयंत्र रचले. विभाग नियंत्रक भंडारा यांनी खोट्या पत्राला ग्राह्य धरून आपली सहमती दर्शवून खोटा कट रचून सदर परवाना रद्द करवून घेतल्याचा आरोप आहे. परंतु सदर पत्र गोंदियाच्या आगार व्यवस्थापकांकडे कुठून आले, याची कोणतीच चौकशी करण्यात आली नाही. तसेच सदर पत्र परिवहन आयुक्त मुंबई यांनी परिवहन आयुक्त ग्वालीयरला उद्देशून लिहिले आहे. त्या पत्राचा अन्य कोणत्याही विभागाशी संबंध नसताना त्या पत्राची कोणतीच प्रत रापच्या मुंबई व भंडारा विभागांना देण्यात आली नाही. याची चौकशी करण्याची तक्रार नरेश जैन यांनी केली. मात्र त्यांच्या तक्रारीला विभाग नियंत्रकाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.