३४८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यागोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त व संवेदनशील असल्याने नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी गोंदिया जिल्ह्यात आणखी ७ सी-६० पार्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. ८ एप्रिल रोजी प्र.पोलीस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर यांनी या पार्ट्या तयार केल्या आहेत. या सात पार्ट्यांमध्ये २२६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यातील ७८ कर्मचाऱ्यांना जेटीएससी प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. तसेच बदली करण्यात आलेले १२२ कर्मचारी सशस्त्र दूरक्षेत्र येथे काम करण्यासाठी त्यांची बदली करण्यात आली आहे. देवरी व सालेकसा मुख्यालयाच्या ठिकाणी सी-६० काटेगे पथक, रक्षा पथक, नेताम पथक, मल्लखांबे पथक यांचे मुख्यालय देवरी तर सी-६० तुरकर पथक, बिसेन पथक व जनबंधू पथक यांचे मुख्यालय सालेकसा राहणार आहेत. सी-६० सालेकसाच्या तुरकर पथकात ३२ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे, सी-६० देवरी नेताम पथकात ३२ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सी-६० देवरी रक्षा पार्टी मध्ये ३४ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, सी-६० सालेकसा जनबंधू पार्टीत ३१ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून रोहीतदास पवार, सी-६० सालेकसा बिसेन पार्टीत ३१ कर्मचाऱ्यांची बदली असून प्रभारी अधिकारी म्हणून अतुल कदम, सी-६० देवरी काटेंगे पार्टीत ३३ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजय गोपाळ, सी-६० देवरी मल्लखांबे पार्टी ३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक दिनेश शेलार आहेत. (तालुका प्रतिनिधी)सर्व कर्मचाऱ्यांना जेटीएससीचे प्रशिक्षण नक्षलग्रस्त भागात काम करण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांना जेटीएससीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातगोळीबार करण्याचा सराव त्यांच्याकडून केला जाणार आहे.
जिल्ह्यात आणखी सात ‘सी-६०’ पार्ट्या
By admin | Updated: April 11, 2017 01:05 IST