शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विजुक्टाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: July 25, 2015 01:40 IST

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने बुधवार (दि.२२) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

गोंदिया : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने बुधवार (दि.२२) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोच्याचे नेतृत्व प्रांत उपाध्यक्ष प्रा. शशिनिवास मिश्रा, जिल्हाध्यक्ष प्रा. एम.जी. दस्तगीर, जिल्हा सचिव प्रा. ज्योतिक ढाले, प्रांत सदस्य प्रा. रोमेंद्र बोरकर यांनी केले. फुलचूर येथील फुंडे विज्ञान महाविद्यालयातून मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी एन.एस. लोणकर यांना मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. शासनाने नवी समस्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसमोर उभी केली आहे. सदोष आॅनलाईन प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील. या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये शासनाने त्वरित दुरूस्ती करावी, यासाठी सदर मोर्चा काढण्यात आला.निवेदनानुसार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सन २०१४-१५ पासून संपूर्ण राज्यात कनिष्ठ महाविद्यालयांची समूह मान्यता आॅनलाईन करण्यात आली आहे, परंतु विद्यार्थी संख्येच्या समुहासाठी निकष शासन निर्णय १९९९, २०००, २००९ यांना विचारात घेण्यात आले नाही. एकापेक्षा अधिक समुहासाठी शहरी, ग्रामीण, आदिवासी व माध्यमिक शाळांना जोडून विद्यार्थी संख्या वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. परंतु आॅनलाईन साफ्टवेअरमध्ये याची कसलीही तरतूद करण्यात आली नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करण्यात यावे. समूह वाचविण्याचा निकष शिथिल करण्यात यावे. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे व इतर मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी सदर निवेदन त्वरित मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना पाठविण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी यांनी दिले. मोर्च्याच्या यशस्वितेसाठी प्रा. अरविंद शरणागत, प्रा. गिरीधर बोरकर, प्रा. पी.झेड. तुरकर, प्रा. सुनील लिचडे, प्रा. चंद्रकिशोर मोरघडे, प्रा. रूखसाना हसन, प्रा. दर्शना वासनिक, प्रा. संजय कलंबे, प्रा. गोवर्धन मेश्राम, प्रा. जागेश्वर भेंडारकर, प्रा. खेमलाल लांजेवार, प्रा. बी.डी. फुलकटवार, प्रा. सी.आर. बिसेन, प्रा. आर.आर. बोपचे, प्रा. व्ही.जे. जाऊळकर, प्रा. अरविंद शरणागत, प्रा.पी.झेड. कटरे, प्रा. संजय कंळबे, प्रा. जी.एम. झामरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)