लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसताना दिसत आहे. कोरोना रूग्ण संख्या झपाटयाने वाढत असतानाच धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक रूग्ण सप्टेंबर महिन्यात वाढल्याचे दिसत आहेत. १३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे.देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती संख्या आजघडीला ३००० रूग्ण संख्या पार करून गेली आहे.यावरून जिल्ह्यात झपाटयाने कोरोना आपली पकड मजबूत करीत असल्याचे दिसत आहे.दररोज रूग्ण संख्या वाढत चालली असून सोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे जिल्हावासी चांगलेच धास्तावलेले आहेत. झपाटया वाढत चाललेल्या या रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्रही दररोजची रूग्ण वाढीची आकडेवारी बघता दिसून येते.जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती तसेच आतापर्यंत वाढत गेलेली रूग्ण संख्या बघता जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिना काळाचा ठरल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील रूग्ण संख्या झपाटयाने वाढली असून २ अंकी रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच ३ अंकात नोंदविली जात आहे.सप्टेंबर महिन्यात २ तारखेला प्रथमच १३७ रूग्ण आढळून आले होते व ती जिल्ह्यातील पहिलीची ३ अंकातील रूग्ण संख्या असल्याचे दिसते.त्यानंतर ही ३ अंकातील रूग्ण संख्या आजापर्यंत कायम आहे. हेच कारण आहे की, रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यात ३१५८ वर पोहचली असून फक्त १३ दिवसांत तब्बल १६७२ रूग्ण नोंदविण्यात आले आहेत.५० टक्के रूग्ण १३ दिवसांतीलसप्टेंबर महिन्यात सुरूवातीपासूनच ३ अंकांत रूग्ण आढळून येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रूग्ण संख्या झपाटयाने वाढली असून आतापर्यंत १३ दिवसांत चक्क १६७२ रू ग्ण नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ३१५८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून सप्टेंबर महिन्यातील १३ दिवसांत १६७२ रूग्ण यात आहेत. म्हणजेच, जिल्ह्यातील ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यातील १३ दिवसांत आढळून आले आहेत.मृतांचा आकडाही सर्वाधिकजिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४९ रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, आतापर्यंतच्या या ४९ रूग्णांमधील ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात दगावले असून त्यांची आकडेवारी या १३ दिवसांत २९ एवढी आहे. म्हणजेच, सप्टेंबर महिन्यात रूग्णांची संख्या सर्वाधिक असतानाच मृतांचीही संख्याही सर्वाधिक असल्याचे दिसत आहे.
सप्टेंबर महिना काळाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST
१३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे. देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती संख्या आजघडीला ३००० रूग्ण संख्या पार करून गेली आहे.
सप्टेंबर महिना काळाचा
ठळक मुद्दे१३ दिवसांत १६७२ कोरोना रूग्ण : आतापर्यंत २९ जणांचा गेला जीव