शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

निकालासाठी आता महिनाभर धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले, युती अथवा आघाडी झाली नाही. त्यामुळे मतांचे विभाजन झाले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या जागा सर्वसाधारण करून १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. तर मंगळवारी ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जि.प.च्या ४५, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. मात्र सर्व जागांची मतमोजणी एकाचवेळी म्हणजे १९ जानेवारीला हाेणार आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर उमेदवारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्यांची धाकधूक कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले, युती अथवा आघाडी झाली नाही. त्यामुळे मतांचे विभाजन झाले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता. तर उमेदवारी देताना काही इच्छुकांना वगळल्याने त्यांनी बंडखोरी करीत निवडणुकीत वेगळी चूल मांडली. तसेच काही अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे ठाकले. त्यामुळे याचा काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेसाठी ७० तर पंचायत समितीसाठी ७३.७६ टक्के मतदान झाले. मतदानाची आकडेवारी ही समाधानकारक आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा तेव्हा याचा विजयाचा समीकरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचे समीकरण यामुळे बिघडणार हे १९ जानेवारीलाच कळणार आहे. मात्र तोपर्यंत भाऊ कोण चालला आणि हा निघू शकतो, या चर्चांनी उमेदवारांची धाकधूक मात्र निश्चित वाढणार आहे. 

युवा मतदारांचा कल कुणाला? - जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या मतदानाची टक्केवारी ही ७० च्या वर आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवा मतदारांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजाविला. युवा मतदार शिक्षित आणि जागरूक असल्याने ते पक्ष पाहून नव्हे, तर उमेदवार पाहून मतदान करतात. त्यामुळे या मतदारांचा कल नेमका कुणाला मिळाला, हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

लक्ष आता ३० जांगाकडे - ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा सर्वसाधारण करुन त्यासाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे यापैकी अधिकाधिक जागा कशा निवडून आणता येतील, यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे या जागांसाठी ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Electionनिवडणूक