शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

सरपंच व ग्रामसेवकाचा स्वमर्जीने कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या बांधकामात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. बांधकामाबद्दलची कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने जागा निश्चित करून ले-आऊट दिले जाते. महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करून सदस्यांची मानहानी करतात. ग्रा.पं.च्या मासिक सभेतील उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा उपयोग ठराव संमतीत दर्शवून सरपंच व ग्रामसेवक कामकाज करीत असल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक मालमत्तेची नासधूस : सदस्यांनी केली चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : झरपडा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कारभार चालवितात.सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या बांधकामात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. बांधकामाबद्दलची कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने जागा निश्चित करून ले-आऊट दिले जाते. महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करून सदस्यांची मानहानी करतात. ग्रा.पं.च्या मासिक सभेतील उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा उपयोग ठराव संमतीत दर्शवून सरपंच व ग्रामसेवक कामकाज करीत असल्याचा आरोप केला आहे. डेकाटे यांचे घराजवळील लोखंडी टिनाचे पंपशेडची तोडफोड करून मजुरीचे पैसे काढण्यात आले. हे शेड सुस्थितीत होते व यामुळे पाणी भरण्यासाठी येणाऱ्या महिलांचे उन्ह व पावसापासून संरक्षण होत होते.विशेष म्हणजे यासंबंधी मासिकसभेचा ठराव घेण्यात आला नाही.नवीन ग्रा.पं.इमारत बांधकामासाठी जागा निश्चिती व ले-आऊट देण्याचे काम स्वमर्जीने मासिक सभेत ठराव न घेता करण्यात आले. ग्रामपंचायत रंगरंगोटीचे काम सदस्यांचा विरोध असतांनाही करण्यात आले. यासाठी ग्रामसेवक व सरपंचाने स्वमर्जीने पैसे काढले. आपल्या हिताचे ठराव लिहून पैशाची उचल केली जाते. गतवर्षी अभ्यास दौऱ्यासाठी ५० हजाराचा खर्च आला असतांना ६२ हजार रु पये परस्पर काढण्यात आले.सरपंचाचे पतीने ग्रा.पं.चे ना हरकत प्रमाणपत्र न घेता आवारभिंतीचे काम केले. शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र ती झाडे लावण्यात आली नाहीत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. सदस्यांनी सभेच्या ठरावाच्या प्रतीची लेखी अर्जाद्वारे मागणी केल्यानंतरही दिली जात नाही. मासिक सभेत अतिक्र मणाविरुद्ध ठराव पारित केल्यानंतरही अतिक्र मणधारकांना प्रोत्साहन दिले जाते. त्यांना कुठलीही नोटीस न बजावता सहकार्य केले जात असल्याचा आरोप उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे, अस्मिता मोटघरे, माधुरी नेवारे, नारद शहारे व सुषमा मडावी या सदस्यांनी लेखी तक्रारीतून केला आहे.आरोप तथ्यहीन - कुंदा डोंगरवारग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे व वैयक्तिक स्वार्थापोटी केले आहेत. ग्रा.पं.इमारत बांधकामासाठी भूमिपूजन करतांना उपसरपंच स्वत: हजर होते. त्यांनी सुद्धा त्यावेळी कुदळ मारली मग विरोध कशाला? यातून त्यांचा हेतू स्पष्ट होतो. यावर्षी वृक्ष लागवड करायची होती. मात्र वन विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेली झाडे लहान असल्याने ते वाया जाऊ नयेत यासाठी लावण्यात आली नाहीत. त्यांची आता वाढ झालेली आहे ते लावण्यात येतील. कुठलेही काम स्वहित न जोपासता पारदर्शकपणे करण्यात आली आहेत. सदस्यांना विश्वासात घेऊनच कामे केली आहेत असे सरपंच कुंदा डोंगरवार व ग्रामसेवक साखरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :sarpanchसरपंच