लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : माकडांचा गावात उपद्रव वाढल्याने पावसाळ्याच्या दिवसात उपयोगात येणारी परसबाग संकटात आली असून कच्च्या घरांचे नुकसान होत आहे. माकडांचा उपद्रव गावकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.देवाच्या रुपात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिक असल्याने त्यांना जीवितहानी पोहोचणे कठीण झाले आहे. मात्र माकडांचा बंदोबस्त न झाल्याने गावात त्यांचा उपद्रव असह्य होत आहे. दररोज गावात प्रत्येक वॉर्डाता माकडांचा उपद्रव वाढत चाललेला आहे. कच्च्या घराचे तर अतोनात नुकसान होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने कच्च्या घरात राहणे कठीण झाले आहे. कवेलू, कच्चे फाटे यांचे नुकसान यामुळे गोरगरिबांचा निवारा संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांसह जनसामान्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मोकळ्या जागेत किंवा पक्या घराच्या छतावर बऱ्याच ठिकाणी परसबाग लावलेली आहे. या परसबागेत माकडांचा उपद्रव वाढल्याने भाजीपाला व फळांची नुकसान अतोनात करीत आहेत. खाणे कमी आणि झाडाचे नुकसान अधिक असे विचित्र काम माकड करीत आहेत. गावात असलेले काही पेरूची झाडे संकटात आली आहेत. यांच्या पेरूच्या झाडा मुळेच आमच्या घरावर माकडे येतात, अशा कारणाने वाद-विवादला जागा मिळत आहे. तरुण मुलं किंवा बालगोपाल हातात लाठ्या धरून त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या कोलांटउड्या मारण्यामुळे घराचे तसेच झाडांचे सुमार नुकसान होत आहे. एका घरावरून दुसऱ्या घरावर, या छतावरून त्या हातावर उड्या मारीत असल्याने कित्येक छतावर असलेल्या दूरदर्शनच्या साहित्याचे नुकसान होत आहे. पाण्याच्या टाक्या व त्यावरील अच्छादन, झाकण, पाईप लाईन धोक्यात आली आहेत. जंगलात असलेले त्याचे नैसर्गिक अधिवास सोडून ते गावातच का स्थिरावतात, याचा वन विभागाकडून अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे. गत चार-पाच वर्षांपासून माकडांनी भरवस्तीत आपला निवारा साधल्याने कच्च्या घरांची नासधूस होत आहे.माकडांचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागाकडे कायदेशीर कोणतेही उपाययोजना नाही. तरीपण वन विभागाचे सहकारी व त्रस्त नागरिक यांच्याशी चर्चा करून शक्य ते करण्याचा प्रयत्न करू.-घनश्याम ठोंबरे,वनपरिक्षेत्राधिकारी, अड्याळ.
पालादूर येथे माकडांच्या उपद्रवाचा सर्वसामान्यांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST
देवाच्या रुपात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिक असल्याने त्यांना जीवितहानी पोहोचणे कठीण झाले आहे. मात्र माकडांचा बंदोबस्त न झाल्याने गावात त्यांचा उपद्रव असह्य होत आहे. दररोज गावात प्रत्येक वॉर्डाता माकडांचा उपद्रव वाढत चाललेला आहे. कच्च्या घराचे तर अतोनात नुकसान होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने कच्च्या घरात राहणे कठीण झाले आहे. कवेलू, कच्चे फाटे यांचे नुकसान यामुळे गोरगरिबांचा निवारा संकटात सापडला आहे.
पालादूर येथे माकडांच्या उपद्रवाचा सर्वसामान्यांना त्रास
ठळक मुद्देपरसबाग संकटात : कच्च्या घरांसह साहित्यांचेही मोठे नुकसान