शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कॅशबुकमध्येच अडकले संगणक परिचालकांचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:58 IST

स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायती अधिक सक्षम होवून गावातील कामात गतीशीलता यावी व नागरिकांची कामे वेळेवर होवून त्यांना लागणाऱ्या आवश्यक बाबी त्वरित मिळाव्या.

ठळक मुद्देपंचायत विभागाचे दुर्लक्ष : स्वाक्षरी करण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायती अधिक सक्षम होवून गावातील कामात गतीशीलता यावी व नागरिकांची कामे वेळेवर होवून त्यांना लागणाऱ्या आवश्यक बाबी त्वरित मिळाव्या. यासाठी राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. हे केंद्र चालविण्यासाठी संगणक परिचारलकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु जिल्ह्याातील ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांना जुलै २०१७ ते मे २०१८ पर्यंतचा मानधन कॅशबुक लिहून न झाल्याने वित्त लेखा अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यामुळे जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे मानधन कॅशबुकमध्ये अडकले असून या प्रकाराने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचा नाकर्तेपणाही समोर आला आहे.जिल्ह्यात राज्य शासनाने पारदर्शक व ग्रामीण भागातील नागरिकांच्या कामांना विशेष महत्व देवून आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. सुरूवातीच्या काळात आपले सरकार सेवा केंद्राची मदतही ग्रामस्थांना मिळू लागली. परंतु अनेक ग्रामपंचायतीत विद्युत पुरवठा तसेच वारंवार होणाऱ्या लिंक फेलची समस्या निर्माण होवू लागल्याने अडचण निर्माण झाली आहे.ज्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हे कार्य करण्याची जवाबदारी आहे, संगणक परिचालक आज मानधनाअभावी सेवा कशी करावी, या विचारात सापडले आहे.१० जुलैला संगणक परिचालकांनी मानधना संदर्भात जिल्हा परिषदेला भेट दिली असता जिल्हा परिषदने आपले सरकार सेवा केंद्राची दोन वर्षांपासूनचे कॅशबुक लिहून न झाल्यामुळे वित्त लेखा अधिकाऱ्यांनी जुलै २०१७ ते मे २०१८ पर्यंतच्या मानधन फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे लक्षात आले. जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामपंचायतीने आपले सरकार सेवा केंद्राबाबदचा निधी जि.प. पंचायत विभागाला देवूनही संगणक परिचालकांचे मानधन होवू शकले नाही.एकीकडे ग्रामपंचायतीवर कॅशबुक ताबडतोब आॅनलाईन करण्यास पंचायत विभागामार्फत निर्देश देण्यात येतात. मात्र, स्वत: पंचायत विभाग दोन-दोन वर्ष कॅशबुक लिहीत नसल्याने आपल्या कार्याप्रती हा विभाग किती तत्पर आहे, हे दिसून येते. विशेष म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक वर्षापासूनचे वेतन रखडले असते तर त्यांनी कोणता पवित्रा घेतला असता, हे सांगण्याची गरज नाही. या अनागोंदी कारभारातून प्रशासन पेपर लेस ग्रामपंचायती कसे करणार, हा सवालही उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यातील संगणक परिचालकांचा प्रलंबित मानधन त्वरित मिळावा, यासाठी वारंवार संगणक परिचालक संघटनेच्या वतीने निवेदन तसेच आंदोलनही करण्यात आले. मात्र, त्याची अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतलेली नाही.त्यामुळे पुन्हा मानधनासाठी संगणक परिचालकांनी आंदोलनासाठी सज्ज रहावे. तसेच मानधनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र साखरे, जिल्हा संघटक सुरेश दशरिया, जिल्हा उपाध्यक्ष नितीन कटरे, जिल्हा सचिव दिलीप वंजारी, धनंजय मते व पदाधिकाºयांनी केली आहे. जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद