शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

मोहफुलाला कृषी उत्पादन म्हणून मान्यता द्यावी

By admin | Updated: December 21, 2014 23:02 IST

मोहफुलाला छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्याप्रमाणे वनविभाग व महसूल विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावे आणि कृषी उत्पादन म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

गोंदिया : मोहफुलाला छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्याप्रमाणे वनविभाग व महसूल विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावे आणि कृषी उत्पादन म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासाठी भाजपच्या शिष्टमडळाने राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १८ डिसेंबर रोजी नागपूर येथील वनभवनात मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली.यावेळी शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर, मोहफूल संघर्ष समितीचे नंदकिशोर असाटी, जयंत शुक्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात, विदर्भात मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे उत्पादन होते. पूर्व विदर्भातील आदिवासी जनतेला मोहफूल संकलनापासून काही काळ रोजगारही उपलब्ध होतो. मात्र शासनाने मोहफुलाला वनोपज उत्पादन म्हणून मंजूरी न दिल्याने मोहफूल संकलन, संग्रह, खरेदी-विक्री, वाहतूक आदी बाबींवर मर्यादा व निर्बंध येत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात मोहफूल उत्पादन विदर्भात होत असले तरी त्याचा लाभ आदिवासी व शेतकरी यांच्यासह व्यवसायाकरिता होत नाही. राज्यातील एकूण वनसंपदेपैकी मोहफुलाचे उत्पादन १० टक्के वनांमध्ये तर ९० टक्के शेतजमिनीमध्ये होते. असे असतानाही, मोहफुलाला कृषी उपज मान्यता न देता वनोपज उत्पादन म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात मोहफुलावर वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाचे नियंत्रण राहत असून या फळावर रॉयल्टी व टी.पी. लागत असल्याने परवानाधारक व्यापारी मोहफुलाची खरेदी करतो. मात्र मोहफूल गोळा करून विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांना त्याचा मोबदला अत्यल्प मिळतो. तसेच मोहफुलावर प्रति क्विंटल १०० रुपये लागणारी रॉयल्टी भरून किंवा न भरताही मोहफूल शेजारील छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यात व्यापाऱ्यांकडून विकला जातो. त्यामुळे राज्याच्या महसूलाचे नुकसान होते. त्यामुळे मोहफुलावरील वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाचे नियंत्रण काढून त्याला कृषी उपज उत्पादनाचा दर्जा मिळाल्यास मोहफूल गोळा करून विक्री करणाऱ्या आदिवासी व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल आणि राज्य शासनाच्या महसूलातही वाढ होईल. त्यामुळे मोहफुलाला वनविभाग व महसूल विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावे आणि मोहफुलाला कृषी उत्पादन म्हणून मान्यता देण्यात यावे असे नमूद आहे.निवेदन देताना, भाजप पदाधिकाऱ्यांसह मोहफुल संघर्ष समितीचे सिताराम अग्रवाल, व्दारकाप्रसाद अग्रवाल, विजेंद्र अग्रवाल, सोमेश गुप्ता, विरेंद्र जैन, दौलत अग्रवाल, दिनेश असाटी, विनोद खंडेलवाल, पंकज सोनवाने आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.