शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज ‘मिस मॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:10 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली.

ठळक मुद्दे४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ : अर्धे शेतकरी अजूनही वेटींगवर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली. मात्र सात महिन्याचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही वेटींगवर आहे. तर तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी शासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असल्याने याला अधिक विलंब होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील एकूण ८४ हजार शेतकरी पात्र असल्याचा दावा शासनानेच केला. पण, आत्तापर्यंत यापैकी केवळ ४१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही अर्धे शेतकरी वेटींगवर असल्याचे चित्र आहे.शेतकरी कर्जमाफीकरिता जिल्ह्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी आत्तापर्यंत केवळ ४१ हजार २५१ अर्ज पात्र ठरले असून त्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिली. जिल्हा बँकेने आत्तापर्यंत २८ हजार ५४ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या रक्कमेपोटी ८९ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या १३ हजार २५१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ कोटी ६८ लाख रुपये जमा केले असून आत्तापर्यंत एकूण ४१ हजार २५१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्हा बँकेचे एकूण ७३ हजार शेतकरी सभासद पात्र ठरले होते. त्यापैकी ४१ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. तर २५ हजार शेतकºयांचे अर्ज आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने हे अर्ज तातपुरते अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती आहे. कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात जिल्हा बँकेने आघाडी घेतली असली तरी राष्ट्रीयकृत बँका यात माघारल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.अधिकाऱ्यांचा वॉचशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सात महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही यातील घोळ संपत नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दोन जिल्ह्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झाले असून बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाकडून कर्जमाफीच्या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत.पुन्हा दोन महिने लागणारकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र या अर्जातील माहिती आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने बँकाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.आत्तापर्यंत केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून अर्धे शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या प्रक्रियेस पुन्हा दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.