शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

भातावर लष्करी अळीचे आक्रमण

By admin | Updated: August 21, 2016 00:13 IST

भात पिकांवर आॅगस्टमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरणाचा परिणाम : नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या उपाययोजना गोंदिया : भात पिकांवर आॅगस्टमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी शेताचे नियमीत सर्व्हेक्षण करून प्रादुर्भाव आढळून आल्यास या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पावसाचा दीर्घ उघाड व बांधीत पाणी नसल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. हया अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करून शेत फस्त करतात. अळ्या रात्री कार्यक्षम असून दिवसा धानाच्या बोचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. अळ्या पानाच्या काठावरुन कुरतडतात त्यामुळे धानाचे पीक निष्पर्ण होते. पीक लोंबी अवस्थेत असतांना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरतडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला दिसतो. प्रती चौरस मीटर मध्ये चार ते पाच अळ्या दिसून आल्यास शेतकऱ्यांनी उपाय करावे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास संबंधित गावातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यात भात पिकांवर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळूून आला आहे. अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करून शेत फस्त करतात. अळ्या रात्री धुऱ्यावरील गवतात लपून बसतात. औषधी पाण्यात मिसळून फवारणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पेशट्टीवार यांनी केले आहे.तिरोडा : वातावरणातील आर्द्रता व खंडीत पाऊस यामुळे किड व रोग प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. काही भागात अल्प प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. भात पिकावर जुलै व आॅगस्टमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या किडीचा ओळख अळीचा पतंग मध्यम आकाराचा १-२ सेमी लांब असून समोरील पंख गडद पिंगट व त्यावर काळसर ठिपका आणि कडेवर नागमोडी पट्टे असतात. पुर्ण वाढलेली अळी २.५-४ सेमी लांब मठ्ठ मऊ हिरवी काळी आणि अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात. मादी २००-३०० अंडी समूहाने पुंजक्याच्या स्वरूपात धानावर/गवतावर घालते. अंडी करड्या रंगाच्या केसानी झाकलेली असतात, अंडी अवस्था ५ ते ८ दिवस, अळी अवस्था २०-२५ दिवस व कोषा अवस्था १० ते १५ दिवसाची असते. कोष धानाच्या बुंध्या जवळील बेचक्यात/जमिनीत आढळतात. लष्करी अळीची एक पिढी पुर्ण होण्यास ३०-४० दिवस लागतात. या अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करतात व शेत फस्त करतात. अळ्या रात्री कार्यक्षम असून दिवसा धानाच्या बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. सर्व ग्रामपंचायत कार्यालयात नोटीस बोर्डवर किड व रोगाचा संदेश लावण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी शेताचे नियमित सर्व्हेक्षण करून प्रादुर्भाव आढळुन आल्यास लष्करी अळीचा बंदोबस्त करावा, असे तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांनी केले आहे.