शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रासमोर व्यापाऱ्यांचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:41 IST

स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊनमध्ये आधारभूत हमीभाव शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. रितसर धानाची खरेदी सुरु होण्यापूर्वीच गावातील धान्य व्यापारी व काही हितसंबंधीत कार्यकर्त्यांनी धानाचे पोते दर्शनी भागात आणून ठेवल्याचे चित्र मंगळवारी (दि.३०) सकाळीच दिसले.

ठळक मुद्देकेंद्राच्या उद्घाटनाची प्रतीक्षा : सर्वसामान्य शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊनमध्ये आधारभूत हमीभाव शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. रितसर धानाची खरेदी सुरु होण्यापूर्वीच गावातील धान्य व्यापारी व काही हितसंबंधीत कार्यकर्त्यांनी धानाचे पोते दर्शनी भागात आणून ठेवल्याचे चित्र मंगळवारी (दि.३०) सकाळीच दिसले. धान खरेदी केंद्र सुरु होण्याची चाहुल लागल्याने काही हुशार कार्यकर्ते व्यापारी आपला हित साधण्यात कमालीची आघाडी घेत असल्याची कैफीयत सामान्य शेतकºयांनी मांडली.मार्केटींग फेडरेशन अंतर्गत सब एजंट म्हणून दि तालुका खरेदी विक्री सहकारी समितीच्यावतीने येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केद्र मंजूर झाले आहे. गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊन मध्ये धानाची खरेदी सुरु होणार आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होणार याची चाहुल लागताच व्यापारी व जवळचे हितचिंतक कार्यकर्ते तसेच मोजक्या काही शेतकºयांनी धानाचे बोरे आणून गोडावून परिसरात ठेवल्याचे दिसत आहे. केंद्रासमोर धानाचे ढिग पडून धान खरेदी करण्याचा मूहूर्तच ठरला आहे. तालुक्यात आधारभूत धान खरेदीचा शुभारंभ झाल्याचे ऐकिवात आहे. येथील धान खरेदी केंद्राला मंजूरी मिळाली. केंद्रासमोर सर्वत्र धानाच्या पोत्यांनी जागा व्यापून गेली. हुशार कार्यकर्ते शेतकºयांनी आपले धान सुरक्षित ठेवले. सर्वसामान्य कास्तकार वाटच पाहत आहे. केंद्रासमोर धान असून खरेदी सुरु करण्यास मुद्दाम विलंब लावत आहे अशी कास्तकारांची ओरड आहे. धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाची प्रतिक्षा करावी लागत आहे. शेतकºयांना सहजरित्या धानाची विक्री करता यावी यासाठी उद्घाटनाची वाट न पाता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करायला अडचण कोणती आहे असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड