शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या ११ कोटीच्या व्यापारी संकुलाला भाडेकरु मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 20:59 IST

हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया रेल्वे स्थानकाबाहेर पाच वर्षांपूर्वी ११ कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल तयार करण्यात आले. मात्र भाड्याचे दर अधिक असल्याने मागील पाच वर्षांपासून एकही भाडेकरु न मिळाले हे व्यापारी संकुल धूळ खात पडले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून संकुल कुलूप बंद : पाच वर्षांनंतर पुन्हा फेरनिविदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया रेल्वे स्थानकाबाहेर पाच वर्षांपूर्वी ११ कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल तयार करण्यात आले. मात्र भाड्याचे दर अधिक असल्याने मागील पाच वर्षांपासून एकही भाडेकरु न मिळाले हे व्यापारी संकुल धूळ खात पडले आहे.दररोज २० हजार प्रवेश प्रवाशांची ये-जा असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागातील बुकींग आॅफिससमोर अत्याधुनिक व्यापारी संकुल पाच वर्षांपूर्वी रेल्वेने तयार केले होते. रेल्वेच्या रिकाम्या जागेचा उपयोग करुन त्याचा रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र रेल्वे विभागाचे तंत्र चुकल्याने मागील पाच वर्षांपासून उत्पन्न मिळणे तर दूर उलट केलेला खर्च सुध्दा निघाला नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे गोंदिया येथे मोठी बाजारपेठ असल्यानेच या शहराला मिनी मुंबई म्हटले जाते.मात्र रेल्वस्थानकाच्या मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल असताना सुध्दा याला वर्षभरापासून भाडेकरु मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे व्यापारी संकुल भाडेतत्वावर देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर विभागाने यासाठी वांरवार निविदा प्रक्रिया काढली. मात्र यात एकाही व्यापारी पुढे आला नाही. परिणामी मागील पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचे व्यापारी संकुल कुलूप बंद आहे. रेल्वे या व्यापारी संकुलाचे बांधकाम करताना तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने याचा कुठलाच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. तर बिलासपूर मुख्यालयातून व्यापारी संकुलाची वांरवार निविदा काढण्यात आली. यासाठी व्यापाऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाले. तर ज्या ठिकाणी हे व्यापारीे संकुल तयार करण्यात आले आहे त्या ठिकाणी व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता कमी असल्याने व्यापारी पुढे येत नसल्याचे बोलल्या जाते. परिणामी मागील पाच वर्षांपासून व्यापारी संकुल केवळ धूळखात व कुलूप बंद पडले आहे.आता नागपूर विभाग काढणार निविदागोंदिया येथील व्यापारी संकुल भाडेतत्त्वावर देण्यासाठी पूर्वी बिलासपूृर मुख्यालयाने ३९ लाख रुपयांची निविदा काढली होती. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्याने आता ही निविदा काढण्याची जबाबदारी नागपूर मंडळावर सोपविण्यात आली आहे. यात निविदेची किमंत पूर्वी पेक्षा कमी करुन २५ लाख रुपये करण्यात आली आहे.व्यापारी संकुलाच्या मोकळ्या जागेचा वापर करारेल्वे विभागाने ज्या ठिकाणी व्यापारी संकुल तयार केले आहे त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा आहे. मात्र त्या जागेचा अद्यापही कुठल्याचा कामासाठी वापर करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे रेल्वे विभागाने या खाली जागेचा वापर योग्य कामासाठी केल्यास यातून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.

टॅग्स :railwayरेल्वे