शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटांत आटोपली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:52 IST

शहराशी निगडीत पाच महत्वाच्या विषयांना घेऊन नगराध्यक्षांनी शुक्रवारी (दि.२७) रोजी बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा पाच मिनिटांत आटोपली.

ठळक मुद्देन.प. विशेष सर्वसाधारण सभा : पाचही विषयांना एकमताने मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराशी निगडीत पाच महत्वाच्या विषयांना घेऊन नगराध्यक्षांनी शुक्रवारी (दि.२७) रोजी बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा पाच मिनिटांत आटोपली. या सभेला उपस्थित सर्व सदस्यांनी पाचही विषयांना एकमताने मंजुरी दिली.विरोधी पक्षातील सदस्यांनी उपाध्यक्षांच्या निवडीच्या विषयाला घेऊन उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने नगर परिषदेच्या सभांवर स्थगिती लावली आहे. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या आमसभेनंतर एकही सभा घेता आलेली नाही. दरम्यान न्यायालयाने सभेसाठी मंजुरी दिल्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शुक्रवारी (दि.२७) शहराशी निगडीत पाच महत्वपूर्ण विषयांना घेऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. या सभेमध्ये आरोग्य विभागातंर्गत सन २०१७-१८ या वर्षाकरिता कीटकनाशक फवारणीकरिता कमी दर मंजूरी, नगर परिषद क्षेत्रातील भकट्या कुत्र्यांची नसबंदी, बेवारस डुकरांचा बंदोबस्त, बांधकाम विभागांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी आणि नगररचना विभागांतर्गत नगर परिषदेच्या मालकीची जागा भूखंड क्रमांक ३०-३ व १२३ मधील क्षेत्र पोलीस स्टेशन रामनगर व कर्मचारी वसाहतीकरिता हस्तांतरीत करणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार, शुक्रवारी १२.१५ वाजता नगराध्यक्षांच्या परवानगीने सभेची कारवाई सुरू झाली. मांडण्यात येणारे विषय शहरासाठी महत्वाचे असल्याने उपस्थित नगरसेवकांनी सर्वच विषयांना एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे पाच मिनिटांतच सभा आटोपली.परिवर्तन आघाडीचे सदस्य नाराजशुक्रवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता सभागृहात सुमारे ३० सदस्य हजर असल्याने व कोरमची पूर्तता झाल्याने सभेला सुरूवात करण्यात आली. सभेला उपस्थित सर्वच सदस्यांनी एकमताने विषयांना मंजुरी दिली. त्यामुळे सभा लवकर संपली. त्यानंतर गोंदिया परिवर्तन आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे, पंकज यादव, लोकेश यादव, ललिता यादव सचीन शेंडे यांच्यासह अन्य सदस्य सभागृहात पोहचले. मात्र तोपर्यंत सभा आटोपली असल्याचे पाहून आघाडीचे सदस्य नाराज झाले. किमान काही वेळ तरी त्यांनी वाट बघायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.पोलिसांचा चोख बंदोबस्तनगर परिषदेत आयोजित सभेला घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त नगर परिषद कार्यालयात दिसून आला. विशेष म्हणजे, ठाणेदार दाभाडे स्वत: नगर परिषद कार्यालयात दिसले. शिवाय मोठ्या संख्येत पुरूष व महिला कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषदेत यापूर्वीही कित्येक सभा पार पडल्या. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच पोलीस बंदोबस्त आढळला नाही.तगडा पोलिस बंदोबस्त पाहून नगर परिषद कर्मचारी देखील अवाक झाल्याचे चित्र होते.