शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा प्रभार सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षक अथवा सेवाजेष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा, या विषयीच्या शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार योग्य कारवाई करणे, जि.प. गोंदियावरून एकस्तर वेतनश्रेणी मंजूर होऊन आलेल्या शिक्षकांना जुलै २०२० च्या वेतनात एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन देणे, सेवा पुस्तीका ऑनलाईन कार्यवाही करणे, शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी,.....

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक संघाची मागणी : गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका देवरीच्यावतीने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या निकाली काढण्यात याव्यात यासाठी तालुका संघाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा प्रभार सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षक अथवा सेवाजेष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा, या विषयीच्या शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार योग्य कारवाई करणे, जि.प. गोंदियावरून एकस्तर वेतनश्रेणी मंजूर होऊन आलेल्या शिक्षकांना जुलै २०२० च्या वेतनात एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन देणे, सेवा पुस्तीका ऑनलाईन कार्यवाही करणे, शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, प्रलंबित देयके, सन २०१२, २०१३ व २०१८ ला झालेल्या प्रशासकीय बदली प्राप्त शिक्षकांचे प्रस्तावर भत्ता, चट्टोपाध्याय व वरिष्ट वेतनश्रेणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविणे, डीसीपीएसधारक शिक्षकांचे हिशेब पावती देण्याची मागणी करण्यात आली.या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले. शिष्टमंडळात तालुका नेते एस. एच. गभने, अध्यक्ष रमेश उईके, जिल्हा कोषाध्यक्ष ए. डी. धारगावे, कार्याध्यक्ष जे. एन. आकरे, सरचिटणीस रोशन टेंभूर्णे, जितेंद्र कोहाडकर, भारत सोनटक्के, मंगलदास सयाम, राजेश रामटेके, निकेश सुखदेवे, मनोज गेडाम, मिलिंद दामले, धनराज धानगाये, लोकेश मेश्राम, के.बी. गभने, एस.आर. लांजेवार, राजेश ब्राम्हण, विष्णू टेकाडे, प्रणीत कराडे, देवेंद्र वलथरे यांचा समावेश होता.

टॅग्स :Teacherशिक्षक