शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या वेळकाढू धोरणाने होतेय मेडिकलच्या विद्यार्थ्यांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

सध्या मेडिकल कॉलेज केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे, तर मेडिकलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयालगत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फ्लॉटमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नवीन बॅचच्या विद्यार्थिनी आल्याने आता एका फ्लॉटमध्ये सहा-सहा विद्यार्थिनींना राहण्याचा आदेश मेडिकलच्या व्यवस्थापनाने काढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू असून, आता सात वर्षांचा कालावधी लोटला, मात्र मेडिकलची इमारत अद्यापही तयार केलेली नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्नसुद्धा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनींना परीक्षेच्या तोंडावर वसतिगृहासाठी धावपळ करावी लागत आहे. एकंदरीत शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे.जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यविषयक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सन २०१४ मध्ये गोंदिया येथे मेडिकल कॉलेज सुरू झाले. सध्या मेडिकल कॉलेज केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे, तर मेडिकलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयालगत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फ्लॉटमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नवीन बॅचच्या विद्यार्थिनी आल्याने आता एका फ्लॉटमध्ये सहा-सहा विद्यार्थिनींना राहण्याचा आदेश मेडिकलच्या व्यवस्थापनाने काढला आहे. त्यामुळे एकाच फ्लॉटमध्ये सहा विद्यार्थिनींनी राहून अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला, तर मेडिकलच्या व्यवस्थापनाने फ्लॉट हे मोठे असून, त्यात सहा विद्यार्थिनी या सहज राहू शकतात. मेडिकलची आणि वसतिगृहाची नवीन इमारत तयार झाल्यानंतर ही अडचण राहणार नाही. मात्र, आता काही दिवस थोडे ॲडजेस्ट करावे लागेल असे सांगितले. मात्र, या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्यांच्या पालकांनी सुद्धा या सर्व प्रकारावर चिंता व्यक्त केली.

बांधकामाला अद्यापही सुरुवात नाहीशहरातील कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ४६८ कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला आहे. पण, अद्यापही या इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. इमारत बांधकामाच्या फाईलचा प्रवास अजूनही ऑफिस टू ऑफिसच सुरू आहे.

लोकप्रतिनिधींचे केवळ आश्वासनच - मेडिकल कॉलेजचे बांधकाम त्वरित सुरू व्हावे यासाठी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत आहेत. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, असे सांगायलासुद्धा ते विसरत नसून याची प्रेसनोटदेखील काढत आहे. मात्र, बांधकामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. 

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयStudentविद्यार्थी