या प्लांटच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी दीपककुमार मिना, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी केली. या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. एफडीएचे वरिष्ठ अधिकारी नरवने, अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, संजय भोंडे, प्रशासकीय अधिकारी, कटरे, परेश बोरसे, शिवम घारड, मोनिका बायोमेडिकल............ उपस्थित होते. लिक्विड ऑक्सिजन निवासी जिल्हाधिकारी येत्या ४ ते ५ दिवसात कार्यान्वीत होईल. व्हीआरडीएल प्रयोगशाळा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदियाकरिता ऑटोमॅटिक आरएनए एक्सट्राकशन मशीन एक नग प्राप्त झाली आहे. येत्या ३ दिवसात सदर मशीन कार्यान्वित होईल. त्यामुळे दैनंदिन आरटीपीसीआर कोविड चाचण्यांची संख्या वाढेल, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तिरपुडे यांनी सांगितले.
मेडिकलच्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे काम युध्दस्तरावर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:21 IST