शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये उष्माघात कक्ष सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

उन्हाळ्याची सुरुवातच तीव्र उन्हाने झाली असून सूर्य आतापासूनच आग ओकताना दिसत आहे. शनिवारी (दि.१) जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसवर गेले होते व या तीव्र उन्हामुळे आता कुलर व पंखेसुद्धा फेल ठरत आहेत. उन्हाची तीव्रता पाहता जिल्हावासीयांना घराबाहेर पडताना विचारच करावा लागत आहे. मात्र, कामामुळे घरात राहणे शक्य नसून बाहेर पडावेच लागते. येथेच उष्माघाताचा धोका संभवतो. 

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्याचा पारा आता ४१ अंश सेल्सिअस पार जात असून तीव्र उन्हामुळे जिल्हावासीयांना बाहेर पडणे कठीण होत आहे. अशा या तीव्र उन्हात उष्माघाताचा धोका वाढत असून दुर्लक्ष केल्यास कित्येकदा रुग्णाचा जीव सुद्धा जातो. हीच बाब लक्षात घेत येथील वैद्यकीय महाविद्यालयाने उष्माघात कक्ष तयार केला  आहे. ४ बेडची व्यवस्था असलेला उष्माघात कक्ष औषध व अन्य सोयींनी सज्ज आहे. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य तापू लागला आहे. हेच कारण आहे की, मार्च महिन्यातच पारा ४१ अंशावर गेल्याचे दिसले. त्यात आता मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली व खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र, उन्हाळ्याची सुरुवातच तीव्र उन्हाने झाली असून सूर्य आतापासूनच आग ओकताना दिसत आहे. शनिवारी (दि.१) जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसवर गेले होते व या तीव्र उन्हामुळे आता कुलर व पंखेसुद्धा फेल ठरत आहेत. उन्हाची तीव्रता पाहता जिल्हावासीयांना घराबाहेर पडताना विचारच करावा लागत आहे. मात्र, कामामुळे घरात राहणे शक्य नसून बाहेर पडावेच लागते. येथेच उष्माघाताचा धोका संभवतो. सातत्याने वाढत चाललेले तापमान व त्यामुळे निर्माण होत असलेला उष्माघाताचा धोका बघता आरोग्य विभाग संचालकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाला उष्माघात कक्ष तयार करण्याचे व त्यातील सुविधांबाबत निर्देश दिले. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांच्या मार्गदर्शनात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. 

४ बेडचे कक्ष तयार - या उष्माघात कक्षात ४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कुलर बसविण्यात आले असून बाथरूममध्ये शॉवर बसविण्यात आले आहे. शिवाय उष्माघात रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व औषधांची सोय या कक्षात करण्यात आली आहे. शिवाय, उष्माघात कक्षातील रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर जायस्वाल, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय माहुले व डॉ. शिल्पा पटेरिया यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 सध्या तरी एकही रुग्ण नाही- वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या कक्षात सध्या तरी एकही रुग्ण नाही. म्हणजेच, अद्याप उष्माघाताचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले नसल्याचे म्हणता येईल. मात्र, वाढते तापमान बघता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

नागरिकांनी खबरदारी घ्यावी उन्हाची तीव्रता बघता नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे. सतत कुलर किंवा एसीच्या हवेत बसू नये. भरपूर पाणी प्यावे व त्यातही  फ्रिजच्या पाण्याऐवजी माठाचे पाणी प्यावे. पांढरे सुती व सैल कपडे घालावेत. काही त्रास असल्यास दुर्लक्ष न करता लगेच वैद्यकीय महाविद्यालय किंवा जवळील रुग्णालय वा आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. -डॉ. अपूर्व पावडे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया 

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य