शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

साखरीटोल्यात मेडीकल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:15 IST

येथील मेडीकल दुकानाला आग लागू संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देआर्थिक मदतीची मागणी : ९ लाख ५९ हजार रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : येथील मेडीकल दुकानाला आग लागू संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्राप्त माहितीनुसार आमगाव-देवरी मुख्य मार्गावरील पोलीस चौकीच्या बाजुला रोहिणी आकाश उर्फ बामेश्वर बावनकर यांच्या मालकीचे विजया मेडीकल स्टोअर्स आहे.आकाश बावणकर हे बुधवारी रात्री ८.३० वाजता दुकान बंद करुन घरी गेले होते. दरम्यान बुधवारी मध्यरात्री त्यांच्या मेडीकलमध्ये स्फोट झाल्याचा आवाज आला. याच परिसरात राहणारे अंकीत असाटी यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लगेच आरडोओरड करून मेडीकलला आग लागल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. परिसरातील नागरिकांनी लगेच मेडीकलकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपूर्ण मेडीकल जळून खाक झाले होते.मेडीकलला लागेल्या आगीत फ्रीज, लॅपटॉप, कॅम्प्यूटर, स्कॅनर, फर्निचर तसेच विविध प्रकारची औषधी व नगदी २५ हजार रुपये जळून खाक झाले. यात एकूण ९ लाख ५९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मेडीकलला शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची तक्रार आकाश बावणकर यांनी सालेकसा पोलीस स्टेशन येथे दाखल केली. पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.

टॅग्स :medicineऔषधंfireआग