शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

एका डॉक्टरसारखा असतो मोटारसायकल मेकॅनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:50 IST

सध्याच्या धावपळीच्या युगात मोटारसायकल ही नागरिकांची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळेच मेकॅनिकना या माध्यमातून एक लघू उद्योग प्राप्त झाला आहे. या उद्योगामुळे लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देवर्षा पटेल : टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्याच्या धावपळीच्या युगात मोटारसायकल ही नागरिकांची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळेच मेकॅनिकना या माध्यमातून एक लघू उद्योग प्राप्त झाला आहे. या उद्योगामुळे लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मोटारसायकल मेकॅनिची सर्वच ठिकाणी मागणी वाढली आहे. मोटारसायकल मेकॅनिक सुद्धा एका डॉक्टरसारखीच सेवा देत असतो, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.नागपूर आॅटोमोबाईल टू व्हिलर मेकॅनीक असोसिएशन व गोंदिया टू व्हिलर मेकॅनीक असोसिएशन यांच्या संयुक्त स्नेहमिलन कार्यक्रम गोंदिया येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे आ.गोपालदास अग्रवाल, माजी दिलीप बन्सोड, संघटनेचे अध्यक्ष निशीकांत पोहनकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय सिंग, रुपेश नाईक, पीयूष अग्रवाल, विलास पेटकर,बनवारीलाल लिल्हारे, महेश कुबडे उपस्थित होते.वर्षा पटेल म्हणाल्या, आॅटोमोबाईल क्षेत्रात सुध्दा प्रचंड स्पर्धा असून रोज नवीन बदल आणि ग्राहकांची आवड निवड बदलत आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत व्यावसायीक, मेकॉनीक यांना हे बदल आत्मसात करण्याची गरज आहे. हे बदल आत्मसात न केल्यास ते स्पर्धेत टिकू शकणार नाही असे सांगितले. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असून बेरोजगार युवकांनी या क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधण्याचे आवाहन केले.या वेळी आ.अग्रवाल व बन्सोड यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी नुतन बिसेन, प्रमोद लिल्हारे, प्रकाश फेडर,असरफ खान, घनश्याम धोटे, सुतम अनमोले, भरत मलेवार,संजू वहिले, प्रताप पटले, महेंद्र मेश्राम, रामेश्वर रार्घोते, हरिभाऊ शहारे, इरफान सैयद, साकीर कुरैली, अविनाश ठवकर, सरफराज शेख, महेश हलमारे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल