शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे समीकरण ठरविणार पुढील विधान परिषदेचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुका होऊ घातलेल्या क्षेत्रात तळ ठोकून बसले आहेत. या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून येतील, त्याला विधान परिषदेची निवडणूक लढविणे तेवढेच सोपे जाणार आहे. त्यामुळे नंतर घोडेबाजार करण्यापेक्षा आताच जेवढा जोर लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देसंभाव्य उमेदवार लावताहेत जोरअधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक २१ डिसेंबरला होऊ घातली आहे. ही निवडणूक जरी स्थानिक स्वराज्य संस्थांची असली तरी या निवडणुकीवर पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे भविष्य अवलंबून आहे. या निवडणुकीतील विजयाचे समीकरण विधान परिषदेच्या उमेदवाराचे गणित ठरविणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावल्याने चूरस वाढली आहे. भंडारा-गोंदिया विधान परिषदेसाठी पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे या निवडणुकीत चांगलाच घोडेबाजार होते. ही निवडणूक म्हणजे जसकी जितनी थैली भारी उसका उतना वजन भारी, अशी असते. विशेष म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवार व राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जोर लावला आहे. आपल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी मागील दोन महिन्यांपासून रननिती आखली जात आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुका होऊ घातलेल्या क्षेत्रात तळ ठोकून बसले आहेत. या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून येतील, त्याला विधान परिषदेची निवडणूक लढविणे तेवढेच सोपे जाणार आहे. त्यामुळे नंतर घोडेबाजार करण्यापेक्षा आताच जेवढा जोर लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण याच निवडणुकीतील विजयाच्या समीकरणावरून विधान परिषदेच्या निवडणुकीचे गणित ठरणार आहे. त्यामुळे यावेळेच्या जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलीच चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिकाधिक उमेदवार निवडून यावे, यासाठी सर्वच पक्षांनी तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी चाचपणी करणे सुरू केले आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे. 

आयात केलेला उमेदवार नकोचा सूर- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. काही मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या मतदारसंघातून तयारी करणे सुरू केले आहे. पण, त्याच ठिकाणी त्याच पक्षाच्या उमेदवारांनी आधीपासून फिल्डिंग लावून ठेवली होती. तर, ऐनवेळी पक्षाकडून बाहेरील आयात केलेल्याला उमेदवारी देऊ म्हणून बाहेरचा उमेदवार नकोच, अन्यथा आम्ही वेगळी चूल मांडू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोरसुद्धा पेच निर्माण झाला आहे. 

महिला उमेदवारांचा शोध घेताना लागतोय कस - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहे. तर, काही ठिकाणी सोडतीदरम्यान सर्वसाधारण महिला असे निघाले, त्यामुळे महिला सदस्यांची संख्या जिल्हा परिषदेत वाढण्याची शक्यता आहे. पण, महिला उमेदवारांचा शोध घेताना सर्वच राजकीय पक्षांचा सध्या कस लागत आहे. 

विधान परिषदेत चेहरे बदलणार - पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार-पाच जणांची नावे चर्चेत आहे. तर, मागील निवडणुकीत नेतृत्व करणारे उमेदवार या निवडणुकीत नेतृत्व करणार नसून त्यासाठी नवीन चेहऱ्यांचा शोध घेतला जात आहे. दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून यासाठी दोन नावेसुद्धा निश्चित करण्यात आली आहे. हे नवीन चेहरे कोण, याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक